Tuesday, May 21, 2024

Latest Posts

CM Eknath Shinde म्हणाले, जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करू नये…

राज्यात गेल्या २ - ३ दिवसांपासून अनेक घटनांमुळे जनतेमध्ये वातावरण बिघडल्याचे चित्र आहे. अकोला, शेवगाव, त्र्यंबकेश्वर या शहरात जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न झाल्याचे दिसून आले.

राज्यात गेल्या २ – ३ दिवसांपासून अनेक घटनांमुळे जनतेमध्ये वातावरण बिघडल्याचे चित्र आहे. अकोला, शेवगाव, त्र्यंबकेश्वर या शहरात जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न झाल्याचे दिसून आले. तसेच त्र्यंबकेश्वर येथील घटनेनंतर राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी एसआयटी चौकशीचे आदेश दिले आहेत. तर आज याच पार्श्वभूमीवर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील त्यांची पहिली प्रतिक्रिया ही दिली आहे. यावेळी बोलताना एकनाथ शिंदेंनी महाराष्ट्रातील जनतेला आवाहन केले आहे.

यावेळी बोलत असताना एकनाथ शिंदे म्हणाले आहेत की, महाराष्ट्रात (Maharashtra) सर्व जातीधर्माचे लोक राहतात आणि कायदा व सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी शासनाची आणि प्रशासनाची आहे, मात्र त्यासाठी नागरिकांनीही सहकार्य करणे गरजेचे आहे. जातीय तेढ होऊ नये, यासाठी समाजातील सर्वांनी पुढे येऊन सहकार्य करण्याची गरज आहे. कायदा व सुव्यवस्था राखणे, शांतता राखणे गरजेचे आहे. त्याचबरोबर शेवटी हा महाराष्ट्र आहे आणि या महाराष्ट्रामध्ये शांतता कायदा सुव्यवस्था अबाधित राखण्याचा काम सरकारचं आहे, ते आम्ही करतोय, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.

तसेच एकनाथ शिंदे म्हणाले आहेत की, कुणीही जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करू नये तसेच कायदा हातात घेण्याचा प्रयत्न करू नये. कायदा सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी शासनाची आहे आणि म्हणून या शासनामध्ये सर्व समाजाला सोबत घेऊन कार्यक्रम उत्सव होत आहेत. परंतु काही समाजकंटक जातीय तणाव निर्माण करण्याचा आणि द्वेष भावना पसरवण्याचा प्रयत्न जाणीवपूर्वक करत असतील तर याच्यावर कठोर कारवाई सरकारच्या माध्यमातून, गृह विभागाच्या माध्यमातून, पोलिसांच्या माध्यमातून होईल. त्यामुळे कायदा सुव्यवस्था राखली गेली पाहिजे. यासाठी सर्वांनी सहकार्य करावे, अशा प्रकारचा आवाहन हे कालच केलेले आहे. शेवटी हा महाराष्ट्र आहे आणि या महाराष्ट्रामध्ये शांतता कायदा सुव्यवस्था अबाधित राखण्याचा काम सरकारचं आहे. तसेच सर्व समाजाने देखील यामध्ये सहकार्य करण्याची आवश्यकता आहे, असल्याचे आवाहन मुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी केले.

हे ही वाचा : 

मविआ ची ‘वज्रमूठ’ सभा पुन्हा एकदा सुरू करणार, जयंत पाटील

Sharad Pawar यांनी बोलावली मविआ ची महत्वाची बैठक, जागा वाटपावर चर्चा होणार?

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा .

Latest Posts

Don't Miss