सध्या राज्याच्या राजकारणात अनेक घडामोडी या सुरु आहेत. अश्यातच उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्या मधील वाद काही थांबायचे नाही घेतच नाही. नुकतंच मिंध्याला दाढी खेचून आणू शकलो असतो, अशा शब्दात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यावर टीका केली होती. मिंध्याला दाढी खेचून आणू शकलो असतो असं म्हणतं उद्धव ठाकरे उद्धव ठाकरे यांनी टीका केली होती. तर आज दिनांक ७ फेब्रुवारी २०२४ रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर पलटवार हा केला आहे.
आज धाराशिवमध्ये कार्यकर्ता मेळाव्यात बोलत असताना एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर हल्लबोल हा केला आहे. धाराशिवमध्ये ते शिवसंकल्प अभियानात मुख्यमंत्री बोलत होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, ते दाढी खेचून आणला असता असे म्हणाले. मात्र, या दाढीकडे तुमच्या खूप नाड्या आहेत. या दाढीने तुमच्या सत्तेचं काय केलं जगाला माहीत आहे. लोकसभेत ४५ पेक्षा अधिक जागा निवडून आणण्याचे आहे. विधानसभेतही विजय मिळवायचा आहे. कामाला लागलं पाहिजे. जनता आपल्या पाठीशी आहे, घरी बसणारे नकोत, त्यांना तर आधीच घरी बसवलं आहे, अशी टीका त्यांनी केली.
आपल्या हातात धनुष्य बाण आहे. प्रभू श्रीरामाचा धनुष्य बाण आपल्या बरोबर आहे. त्यांना त्याची जागा आपण दाखवू. राज्यात प्रत्येक ठिकाणी लोक येत आहेत. ते बाळासाहेबांच्या विचारा मागे आहेत. ते त्यांच्या बाजूने नाहीत. तुमच्याकडे माणसेच नाहीत तर तुमच्याकडे शिवसेना कशी? रडगाणे रोज आहे हे चोरले ते चोरले, यांना विचार नको, यांना स्वार्थ साधायचा होता फक्त. एका मिनिटात शिवसैनिकांच्या खात्यातील पन्नास कोटी त्यांनी घेतले. परवा त्यांना तर देशाच्या प्रधानमंत्रीचे स्वप्न पडले. फेसबुकlive वरील प्रधानमंत्री. सोन्याचा चमचा घेऊन जन्म घेतल्यावर ह्यांना सर्व सामान्य लोकांचे प्रश्न कसे कळणार? कुठे फेडणार हे पाप? अशी विचारणा त्यांनी केली.
हे ही वाचा:
मराठा, धनगर, मुस्लिम आरक्षणाच्या प्रश्नावर संसदेत लक्ष वेधले, सुप्रिया सुळे
व्हॅलेंटाईन डे निमित्त करण जोहरची ‘लव्ह स्टोरीज’ सिरीज लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला