Saturday, May 18, 2024

Latest Posts

पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा; त्याला शोधून त्यावर कारवाई करू – देवेंद्र फडणवीस

राष्ट्रीय तपास संस्थेने (NIA) पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाच्या (PFI) देशभरातील कार्यालयावर छापे टाकल्यानंतर PFI च्या कार्यकर्त्यांनी देशभरातील अनेक ठिकाणी निदर्शने केली. काल पुण्यात पीएफआयच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या निदर्शनावेळी ‘पाकिस्तान जिंदाबाद’च्या घोषणा दिल्या होत्या. त्यानंतर अनेक राजकीय पक्षांनी याचा कडाडून विरोध केला. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला असून राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणावर आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

भाजप नेते नितीश राणे यांच्यानंतर महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा पुण्यामध्ये घडलेल्या घटनेचा निषेद केला आहे. “पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा देणाऱ्यांना सोडणार नाही, त्याला शोधून त्यावर कारवाई करू” अशा शब्दांत फडणवीसांनी इशारा दिला आहे. तर काल पुण्यातील जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर झालेल्या आंदोलनात ‘पाकिस्तान जिंदाबाद’ आणि ‘अल्लाह हूं अकबर’ अशी घोषणाबाजी करण्यात आल्याचा प्रकरण समोर आला, पीएफआयच्या कार्यकर्त्यांनी ही घोषणाबाजी केली आहे.

पोलिसानी घोषणाबाजी करणाऱ्यांना ताब्यात घेतले आहे. घडलेल्या घटनेवर अजून पोलिसांनकडून मौन धरण्यात आले आहे . सध्या व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत असून भाजपचे आमदार राम सातपुते यांनी हा व्हिडिओ ट्वीट केला आहे. पीएफआय संघटनेकडून देशात अशांतता पसरवण्याचे प्रयत्न केले जात असून त्यांच्याकडे चौकशीदरम्यान अनेक पुरावे सापडले आहेत अशी माहिती फडणवीसांनी दिली आहे. त्याचबरोबर पुणे पोलिसांनी घोषणा देण्याचा प्रकार पुण्यात घडला नसल्याचं सांगितलं आहे. तर भारताला हिंदू राष्ट्र बनवण्याचं PFIचं लक्ष्य असल्याचं संबंधित आरोपीच्या चौकशीतून समोर आलं आहे.

हे ही वाचा:

दापोली समुद्रकिनारी सापडलेल्या बोट संदर्भात तटरक्षक दलाचा खुलासा

राष्ट्रीय सिनेमा दिनाच्या निमिताने,’चूप’ चित्रपटाच्या ओपनिंग डेला केली इतकी कमाई

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss