Saturday, March 2, 2024

Latest Posts

देवेंद्र फडणवीसांचं अजित पवारांना पत्र

सुप्रीम कोर्टाने नवाब मलिक यांना वैद्यकीय कारणास्तव जामीन मंजूर केला होता. त्यानंतर मलिक हे जवळपास दीड वर्षाच्या कालावधीनंतर तुरुंगाबाहेर आले होते.

जामिनावर असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार नवाब मलिकहे आज अजित पवार गटात  सहभागी होत सत्ताधारी बाकावर बसले. मलिक हे सत्ताधारी बाकांवर बसल्याने भाजपवरही टीका होऊ लागली असताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी अजित पवारांना पत्र लिहित विरोध केला आहे. सत्ता येते जाते, पण देश महत्वाचा. त्यांना देशद्रोहाच्या आरोपाखाली अटक झाली होती. त्यामुळे त्यांना महायुतीमध्ये सामावून घेता कामा नये असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले. विधिमंडळ अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी सत्ताधाऱ्यांमधील मतभेद समोर येऊ लागल्याची चर्चा होऊ लागली आहे.

हसीना पारकर, सलीम पटेल, १९९३ मुंबई बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपी सरदार खान आणि नवाब मलिक यांनी गोवावाला कंपाउंडमधील मुनीरा प्लंबर या महिलेची तीन एकर जमीन कट रचून बेकायदेशीरपणे हडपल्याचा आरोप आहे. या महिलेने १९९९ मध्ये सलीम पटेलच्या नावाने पॉवर ऑफ एटर्नी जारी केली होती. या द्वारे सलीम पटेलकडून या जमिनीवर असलेल्या बेकायदेशीर अतिक्रमणाबाबत तोडगा काढणे अपेक्षित होते. मात्र, पटेलने याचा दुरुपयोग करत हसीना पारकरच्या सूचनेनुसार गोवावाला कंपाउंडमधील जमीन मलिक यांच्या सॉलिडस इन्व्हेस्टमेंट्स प्रायव्हेट लिमिटेड कंपनीला विकल्याचा आरोप आहे. मलिक यांनी गोवावाला कंपाउंडमधील जागा भाडेतत्वावर देऊन त्यातून आलेल्या पैशांमधून वांद्रे, कुर्ला येथील फ्लॅट्स आणि उस्मानाबादमधील शेतजमीन खरेदी केली असल्याचा ईडीचा आरोप आहे.

सुप्रीम कोर्टाने नवाब मलिक यांना वैद्यकीय कारणास्तव जामीन मंजूर केला होता. त्यानंतर मलिक हे जवळपास दीड वर्षाच्या कालावधीनंतर तुरुंगाबाहेर आले होते.

हे ही वाचा:

हृतिक रोशनचा ‘फायटर’ चित्रपटातील लूक प्रदर्शित

DR. AMBEDKAR यांचा महापरिनिर्वाणाच्या आधीचा दिवस कसा होता?

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss