PM Narendra Modi जीवन हे एका खुल्या पुस्तकासारख आहे – Devendra Fadnavis

PM Narendra Modi जीवन हे एका खुल्या पुस्तकासारख आहे – Devendra Fadnavis

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी काल (शनिवार, ४ मे) साताऱ्यात महायुतीचे उमेदवार उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosle) यांच्या प्रचारार्थ सभा घेतली. यावेळी, त्यांनी सभेत बोलताना, “आजची विराट सभा पाहिल्यानंतर माझ्या मनात शंका नाही. कारण, ४ जूनला गुलाल उधळायलाच यावं लागणार, “असे ते म्हणाले. तसेच शरद पवार (Sharad Pawar) यांना टोला देत, ‘पंतप्रधान मोदींच (PM Narendra Modi) जीवन हे एका खुल्या पुस्तकासारख आहे,’ असे वक्तव्य केले आहे.

सभेनंतर, माध्यमांशी संवाद साधत ते म्हणाले, “संपुर्ण सातारा उदयनराजेंच्या पाठिंशी आहे. सहा पैकी चार आमदार आमच्या महायुतीचे आहेत. एकुणच मला जी परिस्थिती पाहायला मिळत आहे ती प्रचंड प्रतिसाद उदयनराजेंना मिळतो आहे, त्यामुळे त्यांचा विजय निश्चित आहे. कोरानाच्या काळात जो भ्रष्ट्राचार झाला त्यांचे बोलवते धनी कोण होते हे सगळ्यांना माहिती आहे आणि त्यांना आम्ही लवकरच एस्पोज करणार आहोत.”

यावेळी शरद पवार यांच्यावर टीका करत ते म्हणाले, “शरद पवार (Sharad Pawar) म्हणतात मी मोदींवर भाष्य करणार नाही. चांगली पद्धत आहे सगळं भाष्य करायचं आणि मग म्हणायचं मी भाष्य करणार नाही. पण त्यांनी करावं ना, मोदींचं जीवन हे एका खुल्या पुस्तकासारख आहे. ज्यांना जे भाष्य करायचं ते कराव जेव्हा तुम्ही भाष्य कराल तेव्हा ते उलटुन तुमच्या वरतीच येतील.”

हे ही वाचा:

“मला भुमिका पटली नाही म्हणुन,मी मोदींच्या विरोधात होतो”; राज ठाकरेंचा खुलासा

आज एकमेकांवर टीका करणारे नंतर एकत्र हॉटेलमध्ये जेवतात, Prakash Ambedkar यांची विरोधकांवर टीका

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा. 

Exit mobile version