Saturday, May 18, 2024

Latest Posts

आज एकमेकांवर टीका करणारे नंतर एकत्र हॉटेलमध्ये जेवतात, Prakash Ambedkar यांची विरोधकांवर टीका

वंचित बहुजन आघाडीचे (Vanchit Bahujan Aghadi) अध्यक्ष प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी काल (शनिवार, ४ मे) औरंगाबाद येथे माध्यमांशी अनुवाद साधला यावेळी त्यांनी विरोधकांवर टीका करत, “आज एकमेकांवर टीका करणारे मतदान झाल्यानंतर एका हॉटेलमध्ये जेवत बसतात,” असा टोला मारला आहे, प्रकाश आंबेडकर हे मराठवाडा दौऱ्यावर असून वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांचा प्रचार करत आहेत.

यावेळी बोलताना ते म्हणाले, “आपण बोंबलतो मराठवाड्याचा विकास झाला पाहिजे पण रेल्वेसाठी येथे लढा द्यावा लागला. ब्रॉडगेज झाला, सिंगल लाईन झाली पण डबल लाईन झालेली नाही. डबल लाईन करायची झाली असती तर मराठवाड्यामध्ये येण्या जाण्याचा वेळ अर्धा कमी झाला असता. वेळ वाचतो म्हटल्यानंतर उद्योग सुद्धा मोठ्या प्रमाणात आले असते. औरंगाबाद हे विकसित होतं असं वाटलं. वेगवेगळ्या कंपन्या यायला लागल्या त्यातील फक्त चार-पाच कंपनी आहे. उरलेल्या कंपन्या बंद पडल्या. त्याचं कारण आहे ज्या काही सोयी सवलती दिल्या पाहिजे त्या महाराष्ट्र सरकारने दिलेल्या नाही. मराठवाडा हा मागासलेला भाग आहे आणि तो मागासलेला राहिला पाहिजे अशा दृष्टीने महाराष्ट्र शासन काम करत आहे. मी आवाहन करतो सर्वांना आपल्याला जर हे बदलायचं असेल तर इथली सत्ता परिवर्तन पाहिजे आणि सत्ता बदल झाला तर मराठवाड्याचा विकास झाल्याशिवाय राहणार नाही.”

पुढे ते म्हणाले, “ज्या घराणे शाहीला आपण सत्ता देतो ते शरीराचा डावा हात आणि उजवा हात आहे. सत्ता उजव्या हातात आली काय ती शरीराकडे आली म्हणजे कुटुंबाकडे आली अशी परिस्थिती आहे म्हणून आपल्याला या ठिकाणी नाचवण्यात येते. निवडणुकीच्या वेळेस हे दोघं कोंबड्यासारखे झुंजतात आणि आपल्याला असं वाटतं याची झुंज खरी यांची झुंज आहे. ही नौटंकीची झुंज असते हे आपण लक्षात घ्या. हा फक्त देखावा असतो. मतदानांपुरताच मतदान झालं की दुसऱ्या दिवशी दोघं एका हॉटेलमध्ये खाताना आपल्याला दिसतात.”

अहमदनगर येथील सभेत बोलताना ते म्हणाले, “तरुणांच्या हाताला काम पाहिजे का? विभागाचा विकास झाला पाहिजे का ? हे तुम्ही एकदा ठरवा. यासाठी तुमच्याकडे सर्वात मोठे हत्यार आहे ते म्हणजे ही घराणेशाही संपवा आणि कार्यकर्त्यांमध्ये स्पर्धा लावा. घराणेशाही संपली की, पक्षातला कार्यकर्ता मग तो कोणत्याही पक्षाचा असो, त्याला विश्वास संपादन करायचा असतो. त्यासाठी त्याला लोकांशी जुळवून घ्यायचे असते. त्यासाठी जनतेच्या प्रश्नासाठी लढावं लागतं, आवाज उठवावा लागतो.”

हे ही वाचा:

“मला भुमिका पटली नाही म्हणुन,मी मोदींच्या विरोधात होतो”; राज ठाकरेंचा खुलासा

अजितदादा तुमच्यात धाडस असेल तर…..रोहित पवारांचं अजित पवारांना ओपन चॅलेंज

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा. 

Latest Posts

Don't Miss