Friday, April 26, 2024

Latest Posts

Congress मध्ये मतभेद? राहुल यांचा सिद्धरामैय्यांना यांना पाठिंबा तर सोनिया गांधी आहेत शिवकुमारांच्या पाठिशी

नुकतीच कर्नाटक निवडणुकांची रणधुमाळी ही उडाली आहे. कर्नाटकमध्ये काँग्रेस पक्षाचा दमदार विजय हा झाला आहे.

नुकतीच कर्नाटक निवडणुकांची रणधुमाळी ही उडाली आहे. कर्नाटकमध्ये काँग्रेस पक्षाचा दमदार विजय हा झाला आहे. निकाल लागून आता तब्बल ३ दिवस हे होत आलेत परंतु अजूनही कर्नाटकात मुख्यमंत्री कोण होणार याच्यावर काही शिकामोर्तब हा झालेला नाही. काँग्रेस ला अजूनही मुख्यमंत्री ठरवता आला नाही. कर्नाटकात मुख्यमंत्री पदासाठी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष डीके शिवकुमार आणि माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या हे दोन उमेदवार आहेत. त्यामुळे मुख्यमंत्री कोण होणार याकडे सर्वांचं लक्ष हे लागले आहे.

सध्या कर्नाटकात मुख्यमंत्री पदासाठी २ दावेदार आहेत. सिद्धरामैय्या आणि शिवकुमार यांच्या नावावर पक्षात दोन गट पडल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. सध्या दोन्ही नेते दिल्लीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्या निवासस्थानी असून, पक्षश्रेष्ठींची महत्त्वपूर्ण बैठक होत आहे.तर नुकत्याच समोर आलेल्या माहितीनुसार सिद्धरामैय्या आणि शिवकुमार या दोन्ही नेत्यांच्या निवडीबाबत पक्षातील प्रमुख नेत्यांची मतं भिन्न- भिन्न आहेत. म्हणजेच एकीकडे राहुल गांधी आणि केसी वेणुगोपाल यांनी सिद्धरामैय्या यांना पाठिंबा दिला आहे, तर दुसरीकडे सोनिया गांधी या डीके शिवकुमार यांच्या बाजूने आहेत. यामुळे पक्षाचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे अद्याप निर्णयापर्यंत पोहोचलेले नाहीत. सर्व नेत्यांशी चर्चा करुनच ते एका नावावर शिक्कामोर्तब करणार आहेत.

तसेच कार्टनंतकातील या दमदार विजयाचे श्रेय हे शिवकुमार स्वतःला देत आहेत. परंतु दुसरीकडे सिद्धरामेय्या यांच्यासोबत बहुतांश आमदार हे आहेत. पक्षाचे राष्ट्रीय नेते रणदीप सुरजेवाला दोन्ही नेत्यांबाबत तटस्थ आहेत. या सर्व गोंधळादरम्यान, पक्षाध्यक्ष खर्गे दोन्ही नेत्यांना स्वतंत्रपणे भेटणार आहेत. या बैठकीत या दोन्ही नेत्यांची मते जाणून घेतली जातील. परंतु आता कर्नाटकात काँग्रेस पक्षाकडून मुख्यमंत्री पदाची सूत्रे कोणाकडे दिली जाणार याकडे सर्वांचं लक्ष हे लागलं आहे.

हे ही वाचा : 

मविआ ची ‘वज्रमूठ’ सभा पुन्हा एकदा सुरू करणार, जयंत पाटील

Sharad Pawar यांनी बोलावली मविआ ची महत्वाची बैठक, जागा वाटपावर चर्चा होणार?

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा .

Latest Posts

Don't Miss