Saturday, July 27, 2024

Latest Posts

संसदेतील सुरक्षा भंग केल्याप्रकरणी आठ कर्मचारी निलंबित

संसदेतील सुरक्षा भंग केल्याप्रकरणी लोकसभा सचिवालयाने कठोर कारवाई केली आहे.

संसदेतील सुरक्षा भंग केल्याप्रकरणी लोकसभा सचिवालयाने कठोर कारवाई केली आहे. बुधवारी १३ डिसेंबर रोजी झालेल्या सुरक्षेतील त्रुटीप्रकरणामुळे लोकसभा सचिवालयाने आठ कर्मचाऱ्यांना निलंबित केले आहे. या सगळ्या सुरक्षा कर्मचाऱ्यांच्या निष्काळजीमुळे त्यांचे निलंबन करण्यात आले आहे. रामपाल, अरविंद, वीर दास, गणेश, अनिल, प्रदीप, विमित आणि नरेंद्र अशी लोकसभा सचिवालयाने निलंबित केल्याची नावे आहेत. तसेच संसदेत घुसखोरी करणाऱ्या पाच जणांना अटक करण्यात आली आहे. यामध्ये ६ जणांचा सहभाग होता त्यातील ५ जणांना अटक करण्यात आली आहे. तर एक व्यक्ती अजूनही फरार आहे. सध्या विशेष पथकाचे दोन पथक आरोपी ललितचा शोध घेत आहेत.

संसदेतील घुसखोरी प्रकरणाती सागर शर्मा (२६), मनोरंजन डी (३४), अमोल शिंदे (२५) आणि नीलम आझाद (४२) अशी आरोपींची नावे असून पाचव्या व्यक्तीचे नाव विशाल शर्मा आहे. त्याला पोलिसांनी गुरुग्राम मधून अटक केली. पोलिसांनी या प्रकरणी UAPA अंतर्गत गुन्हा देखील दाखल केला आहे. अटक करण्यात आलेल्यांची चौकशी करण्यात येत आहे.लोकसभा सचिवालयाच्या विनंतीवरून सुरक्षा त्रुटींची चौकशी करण्यासाठी एक समिती स्थापन करण्यात आली आहे. केंद्रीय राखीव पोलीस दलाचे (CRPF) महासंचालक अनिश दयाल सिंह या समितीचे नेतृत्व करतील. गृह मंत्रालयाच्या प्रवक्त्याने सांगितले की, समितीमध्ये इतर सुरक्षा एजन्सींचे सदस्य आणि तज्ज्ञांचाही समावेश करण्यात आला आहे. सुरक्षेतील त्रुटीचे कारण शोधून कारवाईची शिफारस करणे हे समितीचे काम आहे.

दरम्यान, तृणमूल काँग्रेसचे (TMC) खासदार डेरेक ओब्रायन यांना संसदेच्या हिवाळी अधिवेशनाच्या उर्वरित कामकाजातून निलंबित करण्यात आले आहे . ओब्रायन यांच्यावर सभागृहाच्या कामकाजात अडथळा आणल्याने कारवाई करण्यात आली आहे. त्यामुळे त्यांना राज्यसभेतून अधिवेशन काळासाठी निलंबित करण्यात आले आहे . बुधवारी दुपारी लोकसभेतील सुरक्षेतील गोंधळानंतर आज गुरुवारी (१४डिसेंबर) संसद पुन्हा एकदा सुरू झाली आहे. यादरम्यान ओब्रायन यांनी राज्यसभेच्या कामकाजात व्यत्यय आणण्यास सुरुवात केली, त्यानंतर त्यांना निलंबित करण्यात आले आहे. दुसरीकडे, काँग्रेसचे पाच लोकसभा खासदार, टीएन प्रतापन, हिबी इडन, एस जोथिमनी, रम्या हरिदास आणि डीन कुरियाकोसे यांनाही लोकसभेतून उर्वरित सत्रासाठी निलंबित करण्यात आले आहे.

हे ही वाचा:

राज्यात अत्यंत भयावह परिस्थिती असताना सरकारचे दुर्लक्ष आणि जनता वाऱ्यावर, नाना पटोले

कृष्णा नदी कोरडी पडली आहे, उपसा सिंचन योजना बंद…, जयंत पाटील

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा. 

Latest Posts

Don't Miss