Saturday, May 18, 2024

Latest Posts

दिल्लीत होणाऱ्या NDA बैठकीला, Eknath Shinde – Ajit Pawar लावणार हजेरी

भाजपविरोधी पक्षांची बंगळुरुत आज बैठक होत असतानाच दिल्लीत सत्ताधारी पक्षाने बैठक आयोजित केली आहे. या बैठकीचं आयोजन भाजपप्रणित एनडीएने (NDA) केले आहे. सत्तेचं केंद्र असलेल्या राजधानी दिल्लीत संध्याकाळी पाच वाजता एनडीएची बैठक होणार आहे. दिल्लीत होणाऱ्या या बैठकीत तब्ब्ल ३८ पक्ष सहभागी होणार आहे. तसेच महाराष्ट्रातून देखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) सोबतच अजित पवार गटाचे प्रफ्फुल पटेल (Praful Patel) हे या बैठीकीला उपस्थित राहणार आहेत.

आगामी लोकसभा निवडणुकीसाठीची मोर्चेबांधणी करण्यासाठी भाजपने ही बैठक बोलावली आहे. या बैठकीविषयी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा (JP Nadda) यांनी माहिती दिली. “ही बैठक सत्ता मिळवण्यासाठी नाही तर सेवा करण्यासाठी होत आहे. एनडीएच्या २५ व्या वर्धापन दिनानिमित्त होणाऱ्या या शक्तिप्रदर्शनात ३८ पक्ष सहभागी होणार आहेत. गेल्या ९ वर्षात एनडीएच्या सर्व पक्षांनी या आघाडीच्या विकासाचा अजेंडा, योजना, धोरणे, जी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांच्या नेतृत्वाखाली चालवली जात आहेत, यात रस दाखवला आहे. एनडीएकडे सर्व पक्ष उत्साहाने येत आहेत,” असं जेपी नड्डा म्हणाले.

या बैठकीला भाजपचे काही जुने मित्रपक्ष सुद्धा उपस्थित राहण्याची शक्यता आहे. म्हणजे भाजपपासून फारकत घेतलेले अकाली दलचे सुखबीर सिंह बादल (Sukhbir Singh Badal), टीडीपीचे चंद्राबाबू नायडू (Chandrababu Naidu) देखील पुन्हा एनडीएमध्ये सहभागी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. शिवाय लोक जनशक्ती पार्टीचे चिराग पासवान (Chirag Paswan) यांचही नाव चर्चेत आहे.

हे ही वाचा:

शरद पवारांची इतक्या वर्षांची साथ का सोडली? दिलीप वळसे-पाटील म्हणाले…

पावसाळी अधिवेशनापूर्वी मंत्रिमंडळ विस्तार करु असा शिंदे-फडणवीस-पवार सरकारचा मानस

हिंदू असो की मुस्लिम यांचे रक्त एकच, एकनाथ शिंदे

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss