Friday, May 17, 2024

Latest Posts

Election Result 2023, एमपी-राजस्थाननंतर छत्तीसगडमध्येही भाजपचे सरकार? जाणून घ्या प्रत्येक राज्याची स्थिती…

मिनी लोकसभा (Mini Lok Sabha) म्हणून पाहिल्या जात असलेल्या राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड, तेलंगणा आणि मिझोराम या पाच राज्यांची (Assembly Election Results) मतदान प्रक्रिया पार पडली.

मिनी लोकसभा (Mini Lok Sabha) म्हणून पाहिल्या जात असलेल्या राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड, तेलंगणा आणि मिझोराम या पाच राज्यांची (Assembly Election Results) मतदान प्रक्रिया पार पडली. त्यानंतर आता पाचपैकी चार राज्यांचा निकाल जाहीर होत आहे. मिझोराममध्ये सोमवारी ४ डिसेंबरला मतमोजणी होईल. लोकसभेच्या निवडणुकांची (Lok Sabha Election) रंगीत तालीम म्हणून या निवडणुकांकडे पाहिलं जात आहे. चार राज्यांच्या (मध्य प्रदेश, छत्तीसगड, राजस्थान आणि तेलंगणा) विधानसभा निवडणुकांसाठी मतमोजणी सुरू आहे. सकाळी ११ वाजताच्या ट्रेंडनुसार कोणत्या राज्यात कोण आघाडीवर आहे ते सांगूया. सध्या मध्यप्रदेशात भाजपचे सरकार आहे, छत्तीसगड आणि राजस्थानमध्ये काँग्रेसचे सरकार आहे, तर तेलंगणात बीआरएसचे सरकार आहे.

मध्य प्रदेश – मध्य प्रदेशातील २३० जागांसाठी ट्रेंड आले आहेत. सकाळी ११ वाजेपर्यंतच्या ट्रेंडनुसार भाजप १५७ जागांवर आघाडीवर आहे, तर काँग्रेस ७० जागांवर आघाडीवर आहे. सध्या, ट्रेंडमध्ये काँग्रेस आणि भाजपमध्ये लढत दिसून येत आहे. इतर पक्षांची ३ जागांवर आघाडी आहे.

छत्तीसगड – छत्तीसगडच्या सर्व ९० जागांसाठीही ट्रेंड आले आहेत. सकाळी ११ वाजेपर्यंतच्या ट्रेंडनुसार भाजप ५३ जागांवर पुढे आहे, जे सरकार स्थापनेकडे बोट दाखवत आहे. काँग्रेस ३५ जागांवर आघाडीवर आहे. सध्या, ट्रेंडमध्ये काँग्रेस आणि भाजपमध्ये लढत दिसून येत आहे. इतर दोन जागांवर पुढे आहेत.

राजस्थान – राजस्थानमधील १९९ जागांचे ट्रेंड जाहीर झाले आहेत. ट्रेंडनुसार भाजप ११२ जागांवर आघाडीवर आहे, तर काँग्रेस ७१ जागांवर आघाडीवर आहे. सध्या, ट्रेंडमध्ये काँग्रेस आणि भाजपमध्ये लढत दिसून येत आहे. इतर पक्ष १६ जागांवर पुढे असून ते किंगमेकरची भूमिकाही बजावू शकतात.

तेलंगणा – तेलंगणात सकाळी ११ वाजेपर्यंतच्या ट्रेंडनुसार काँग्रेस ६८ जागांवर आघाडीवर आहे, तर बीआरएस ३८ जागांवर आघाडीवर आहे. ८ वाजताच्या ट्रेंडमध्ये भाजप ५ जागांवर पुढे आहे. छत्तीसगडमध्ये दोन टप्प्यात निवडणुका झाल्या. पहिल्या टप्प्यात ७ नोव्हेंबर रोजी २० जागांसाठी मतदान झाले होते. यानंतर १७ नोव्हेंबर रोजी छत्तीसगडच्या उर्वरित ७० आणि मध्य प्रदेशच्या २३० जागांवर मतदान झाले. राजस्थानमध्ये २५ नोव्हेंबर रोजी १९९ जागांसाठी मतदान झाले होते, तर तेलंगणातील ११९ जागांसाठी ३० नोव्हेंबर रोजी मतदान झाले होते.

हे ही वाचा:

KBC च्या कार्यक्रमात अमिताभ बच्चन यांनी सून ऐश्वर्याचं केलं कौतुक

Politics: राष्ट्रवादी पक्ष पवार साहेबांमुळेच वाढला, जितेंद्र आव्हाड यांची पोस्ट चर्चेत

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss