Saturday, July 27, 2024

Latest Posts

Exclusive : ‘टाईम महाराष्ट्र’ चा प्रश्न ऐकताच जयंत पाटीलांच्या घशाला पडली कोरड, अशी केली सारवासारवी…

मुंबईमध्ये सुरु असलेल्या राज्य विधिमंडळाच्या अधिवेशनाचा आजचा दुसरा दिवस होता. हा संपूर्ण दिवस काहीसा नाट्यमय ठरला आहे. याच कारण म्हणजे सकाळच्या सत्रातच एक मोठी अपडेट घडली आहे

मुंबईमध्ये सुरु असलेल्या राज्य विधिमंडळाच्या अधिवेशनाचा आजचा दुसरा दिवस होता. हा संपूर्ण दिवस काहीसा नाट्यमय ठरला आहे. याच कारण म्हणजे सकाळच्या सत्रातच एक मोठी अपडेट घडली आहे. जे मराठा आरक्षणाचं आंदोलन झालं त्या आंदोलनाच्या संदर्भात मनोज जरांगे पाटील यांच्याकडून झालेल्या चुका आणि या आंदोलनाला ज्यांनी पाठिंबा दिला किंवा यात जी नाव समोर आली त्या नावांची खातरजमा करून त्यावर कारवाई करण्यासाठी राज्यसरकारने एसआयटी (SIT) बनवण्याचा निर्णय हा घेतला आहे.

अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवसाचे पहिले सत्र हे काहीसे वादळी आणि नाट्यमय होते. मनोज जरांगे पाटील यांनी मला सलाईनमधून विष देण्याचा देवेंद्र फडणवीस यांचा प्रयत्न होता असा आरोप केला. परंतु या आरोपांनंतर भाजपने आणि राज्यसरकारने एकूणच जरांगेच्या बाबतीत काही ठोस आणि कडक पाऊले उचलायचे ठरवलं आहे. मराठा आरक्षण हा विषय काहीसा संवेदनशील आहे त्यामुळे मनोज जरांगे पाटील हे बोलत होते आणि सगळेच त्यांना घाबरत होते. त्यामुळे राज्यातील सर्वात मोठा असलेला समाज म्हणजे मराठा समाजाला दुखवू नये अशी सर्वांचीच भावना होती. परंतु मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मनोज जरांगे पाटील याना जी ढील दिली त्या ढील चा गैरफायदा घेत जरांगे पाटील जे काही सुसाट सुटले त्यामुळे भाजप हे काहीसे तणावात आल्याचे चित्र दिसून येत आहे. आज ज्यावेळी एसआयटी निर्माण करण्यात आली त्याचा उद्देशच हा होता की, मनोज जरांगे पाटील यांना ज्या नेत्यांनी मदत केली आहे ते समजावे. त्यामध्ये विधानपरिषदेत भाजपचे नेते प्रवीण दरेकर यांनी राजेश टोपे यांच्या सह शरद पवार यांच्यावर आरोप केले आहेत. शरद पवार यांनी या संपूर्ण आंदोलन छुपा पाठिंबा हा दिला आहे त्याच बरोबर आर्थिक मदत केले आहे असं देखील दरेकर म्हणाले आहेत.

आज सभागृहात जे आरोप झाले हे कसे चुकीचे आहेत हे सांगण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी माध्यमांशी संवाद आला. यावेळी ‘टाईम महाराष्ट्र’ चे संपादक ‘राजेश कोचरेकर’ यांनी विचारलेल्या प्रश्नावर जयंत पाटील हे काहीसे शांत झाल्याचे चित्र दिसून आले आहे. आंदोलन, जरांगे की सरकार नेमकं कोण भरकटलं? या प्रश्नावर उत्तर देतांना जयंत पाटील यांनी १० – १५ सेकंद विचार केला, त्यानंतर त्यांनी जरांगे-पाटील संतुष्ट नाहीत, समाधानी नाहीत म्हणजे त्यांच्या मागण्या पूर्ण झाल्या नाहीत. सरकारमध्ये असलेले ओबीसी नेते सुद्धा काही करू शकले नाही असे उत्तर जयंत पाटील यांनी दिले.

एकंदरीत यावरून मनोज जरांगे पाटील यांच्याबद्दल असलेली भीती लक्षात येते. कारण जयंत पाटील हे मराठा आरक्षणासंदर्भात बोलले आहेत त्याचबरोबर सरकारबद्दल बोलले आहेत परंतु मनोज जरांगे पाटील यांच्याबद्दल ते एक शब्दही अजूनन बोलले नाहीत. अशीच परिस्थिती भाजपची देखील होती आणि अशीच परिस्थिती मुख्यमंत्री आणि त्यांच्या सहकाऱ्यांची देखील होती. परंतु आता स्वतः मुख्यमंत्री हे कावलेले आहेत. कारण जरांगे पाटील हे समजूतदारपणे या सर्व गोष्टींकडे पाहत नाहीत. तसेच आजची मुख्यमंत्री म्हणले आहेत जर आमही आरक्षण दिले तर मग इतके पुन्हा पुन्हा आंदोलन करून सर्व परिस्थिती बिघडवण्याचं कारण काय?

परंतु आज दिवसभरात राजेश टोपेंवर जे आरोप झाले ते आपल्यावरील आरोप खोटे आहेत असं म्हणायचं प्रयत्न त्यांनी केला आहे . राजेश टोपे यांनी या आंदोलनाला मदत केली आहे हे त्यांनी स्वतः सांगितले आहे. कारण हे टोपे हे त्या भागातील लोकप्रतिनिधी होते त्यामुळे त्यांना सहभाग घेणे गरजेचे होते पण सहभाग असणे वेगळे आणि त्या सहभागाचा रूपांतर कटात होणं वेगळं या दोन गोष्टी आज समोर आल्या आहेत. परंतु आज विधानभवनाच्या परिसरात ज्या घटना घडल्या त्यामुळे एकंदरीत समजले की, राज्यातील सर्व नेत्यांना मनोज जरांगे पाटील यांची एक वेगळी भीती होती असं म्हंटल तर ते नक्कीच चुकीचं ठरणार नाही. परंतु आता मनोज जरांगे पाटील यांची भीती त्यांनी स्वतःच संपवून टाकली आहे. परंतु आता मनोज जरांगे पाटील यांच्या भोवती भाजपने जो काही कारवाईचा पाश घातला आहे त्यातील सर्वात अधिक फटका हा राष्ट्रवादीला, राजेश टोपेंना, रोहित पवार आणि शरद पवार यांना बसणार आहे. पण हा एसआयटी चा फास आवळला गेला तर जी गोष्ट अजित पवार आणि शरद पवार यांच्या बाबतीत घडते तेच बहुदा मनोज जरांगे पाटील आणि इतर राजकारण्यांचा होईल. कारण कोणत्याही नेत्यांनी मनोज जरांगे पाटील यांच्या भाषेचं समर्थन हे केलेले नाही आहे. ज्या भाषेने मराठा मजला आरक्षण देण्याचा महत्वाचा पल्ला गाठला त्याच भाषेने, ती भाषा ज्या माणसाची आहे त्यानेच मराठा समाजाचा विचका केला आहे असं आपण अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवसाच्या सुर्यास्थाला म्हणू शकतो.

हे ही वाचा:

फक्त आजच नाही तर ३६५ दिवस ‘मराठी भाषा गौरव दिन’ साजरा व्हायला हवा – Raj Thackeray

मुंबईत आज पाणीपुरवठा बंद; काही भागात १०० टक्के तर ३० टक्के पाणीपुरवठा बंद

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss