Sunday, May 19, 2024

Latest Posts

Exlusive जेव्हा ‘मन की बात’ मधून तुम्ही चांगल ऐकता तेव्हा विरोधकांचा कल्लोळ ऐकू येत नाही – पूनम महाजन

MP Poonam Mahajan : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तळागाळातील माणसापर्यंत पोहोचण्यासाठी आकाशवाणीच्या माध्यमातून 'मन की बात' कार्यक्रमाला सुरुवात केली. 'मन की बात' च्या माध्यमातून दर महिन्याच्या शेवटच्या रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी श्राव्य माध्यमातून अखंड भारतवासीयांसोबत संपर्क साधतात.

MP Poonam Mahajan : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तळागाळातील माणसापर्यंत पोहोचण्यासाठी आकाशवाणीच्या माध्यमातून ‘मन की बात’ कार्यक्रमाला सुरुवात केली. ‘मन की बात’ च्या माध्यमातून दर महिन्याच्या शेवटच्या रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी श्राव्य माध्यमातून अखंड भारतवासीयांसोबत संपर्क साधतात. याच ‘मन की बात’ कार्यक्रमाने आपले शतक पूर्ण केले आहे. यालाच अनुसरून आकाशवाणीवरून सादर होणाऱ्या आजच्या शतकी कार्यक्रमाला केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विलेपार्ले येथील डहाणूकर महाविद्यालयातील घैसास सभागृहात हजेरी लावली होती. दरम्यान तेथील स्थानिक लोकप्रतिनिधी खासदार पुनम महाजन यांच्या सोबत टाईम महाराष्ट्राने Exlusive संवाद साधला आहे.

पंतप्रधानांच्या या शतकपूर्ती ‘मन की बात’ कार्यक्रमासाठी आम्ही उत्साहीचं आहोत. कारण यामध्ये राजकारण नाहीये एक असा विश्वानेता भारताचा पंतप्रधान आहे ज्यांनी देशाच्या जडणघडणीत वर्षानुवर्षे प्रगतीला ताकद दिली, भारताला पुढे घेऊन जाण्यासाठी ते कामी येणार आहे, अगदी लहान मुलापासून दे घरातील वयोवृद्धांपर्यंत प्रत्येक वयाच्या माणसांना ‘मन की बात’ शिकण्याचा उत्साह असतो. असं खासदार पूनम महाजन यांनी टाईम महाराष्ट्र सोबत बोलताना सांगितलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘मन की बात’ कार्यक्रमासाठी केंद्रीय गृहमंत्री स्वतः येथे येत आहेत माझ्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे असं पूनम महाजन म्हणाल्या आहेत.

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या मुंबई दौऱ्यानिमित्त महाविकास आघाडी आक्रमक झालेली पाहायला मिळत आहे. येऊ घातलेल्या मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अमित शहा यांचा मुंबई दौरा असल्याचं विरोधी पक्षाचं म्हणणं आहे. प्रश्न जेव्हा खासदार पूनम महाजन यांना विरोधकांच्या या भूमिकेबद्दल प्रश्न विचारला असता, जेव्हा तुम्ही ‘मन की बात’ मधून चांगलं एकत असता तेव्हा विरोधकांचा कल्लोळ कुठे ऐकू येत नाही जनता सगळी ‘मन की बात’ ऐकत आहे. जेव्हा चांगला सोहळा आपण देशात साजरा करतो देशाचा उत्सव बनवतो तेव्हा विरोधकांनाही कळवा की कुठे काय बोलावं असं म्हणत खासदार पूनम महाजन यांनी विरोधकांना टोला लगावला आहे.

हे ही वाचा : 

मुख्यमंत्री पदासाठी नवा दावेदार तयार होण्याची शक्यता – अमोल कोल्हे

कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीवर महाविकास आघाडीचा झेंडा

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

Latest Posts

Don't Miss