Wednesday, April 24, 2024

Latest Posts

अखेर ठरला कर्नाटकाचा मुख्यमंत्री? या दिवशी होणार शपथविधी…

कर्नाटकात १० मे रोजी विधानसभा निवडणुकांसाठी मतदान झाले. तर, १३ मे रोजी मतमोजणी होऊन निकाल जाहीर झाला. या निकालात काँग्रेसला स्पष्ट बहुमत मिळाले आहे. त्यामुळे कर्नाटकातील सत्तेच्या चाव्या आता काँग्रेसला मिळणार असल्याचे स्पष्ट आहे.

कर्नाटकात १० मे रोजी विधानसभा निवडणुकांसाठी मतदान झाले. तर, १३ मे रोजी मतमोजणी होऊन निकाल जाहीर झाला. या निकालात काँग्रेसला स्पष्ट बहुमत मिळाले आहे. त्यामुळे कर्नाटकातील सत्तेच्या चाव्या आता काँग्रेसला मिळणार असल्याचे स्पष्ट आहे. परंतु, सिद्धरामय्या आणि डि. के. शिवकुमार यांच्यात मुख्यमंत्री पदावरून पेच निर्माण झाला होता. दोघेही पक्षातील ज्येष्ठ आणि अनुभवी नेते असल्याने मुख्यमंत्री पदाचे प्रकरण हायकमांडकडे गेले. निवडणूक प्रचारादरम्यान काँग्रेसने मुख्यमंत्री पदाचा चेहरा जाहीर केला नव्हता. आधी निवडणूक होऊ द्या, मग मुख्यमंत्री ठरवू अशी भूमिका मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत असलेल्या नेत्यांनी केल्याने निवडणूक प्रक्रिया यशस्वी पार पडली. परंतु, आता निकालानंतर मुख्यमंत्री पदाची खूर्ची कोणाच्या ताब्यात जाणार यावरून दोन्ही नेत्यांमध्ये संघर्ष निर्माण झाला.

कर्नाटकात काँग्रेसला अभूतपूर्व यश मिळालं असलं तरीही अद्यापही मंत्रिमंडळ तयार झालेलं नाही. सिद्धरामय्या आणि शिवकुमार या दोघांमध्ये मुख्यमंत्री पदावरून रस्सीखेच सुरू असल्याने मंत्रिमंडळाचा पेच निर्माण झाला आहे. गेल्या ४८ तासांपासून या दोघांनीही दिल्लीत ठाण मांडल्याने कर्नाटकचा पुढचा मुख्यमंत्री कोण याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. दरम्यान, कर्नाटकच्या मुख्यमंत्री पदासाठी सिद्धरामय्या यांच्या नावावर शिक्कमोर्तब झाले असल्याचे वृत्त सूत्रांच्या हवाल्याने एएनआय या वृत्तसंस्थेने दिले आहे. तर शपथविधी कार्यक्रम २० मे रोजी होण्याची शक्यता आहे.

सिद्धरामय्या हे कर्नाटकचे पुढील मुख्यमंत्री आणि डीके शिवकुमार उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. इतके नव्हे तर शपथविधीचा मुहूर्तदेखील ठरला आहे. काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी कर्नाटक सरकार स्थापनेसाठी एकमत केले. २० मे रोजी बंगळुरू येथे शपथविधी सोहळा होणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या तीन दिवसांपासून कर्नाटकात राजकीय नाट्य सुरु होते. दरम्यान, मध्यरात्री जोरदार चर्चेनंतर काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांचे सरकार स्थापनेसाठी एकमत झाले. सिद्धरामय्या आणि डीके शिवकुमार हे कर्नाटकातील काँग्रेसच्या विजयाचे मुख्य शिल्पकार होते. २० मे रोजी काँग्रेस विधिमंडळ पक्षाची बैठकही बोलावण्यात आली आहे, ज्यामध्ये ७५ वर्षीय सिद्धरामय्या दुसऱ्यांदा मुख्यमंत्री बनणार आहेत.

हे ही वाचा : 

संजय राऊतांवर हक्कभंग आणला जाऊ शकतो, अब्दुल सत्तार

कात्रज बोगदा ते नवले पुलापर्यंत जड वाहनांनी ठेवा वेगमर्यादा कमी

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

Latest Posts

Don't Miss