Friday, May 17, 2024

Latest Posts

वेदांतापेक्षा मोठा प्रकल्प राज्याला देऊ, उदय सामंतांचे आवाहान

महाविकास आघाडीचे सरकार असताना वेदांता-फॉक्सक्वान प्रकल्प महाराष्ट्रात येणार नाही असं त्याचवेळचे तत्कालिन औद्योगिक मंत्र्यांनी स्पष्ट केले होते अशी माहिती उदय सामंत यांनी दिली आहे. त्यामुळे त्याचवेळी हेच स्पष्ट झाले होते. जानेवारी महिन्यामध्येच या कंपन्यांकडून मविआ सरकार असतानाच काय काय देण्यात येईल अशी विचारणा करण्यात आली होती. मात्र त्यानंतरही कोणत्याही प्रकारे प्रतिसाद देण्यात आला नाही, त्यामुळे आता शिंदे सरकारवर ज्या प्रकारे टीका केली जाते आहे, त्याला उत्तर देण्यासाठी उदय सामंत यांनी माध्यमांशी संवाद साधला. यात त्यांनी म्हटले,”वेदांता प्रकल्प गुजरातला गेल्याचं खापर आमच्यावर फोडू नका. सगळं जे वाईट होतंय, ते आमच्यामुळं आणि चांगलं घडतंय, ते तुमच्यामुळं असं होत नसतं, अशी टीका राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी ‘महाविकास आघाडी’वर केली.

हेही वाचा : 

महाराष्ट्रातील मुख्य नेत्यांच्या उपस्थितीत, मॉस्को येथे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याचे अनावरण

पुढे सामंत म्हणाले, “हा प्रोजेक्ट इथं आणण्यासाठी 8 ते 9 महिन्यांपासून प्रयत्न करत होतो. अनेक प्रोत्साहन योजना शासनासमोर ठेवल्या होत्या. दोन महिन्यांपूर्वीच शिंदे-फडणवीसांचं सरकार आलं. वेदांताला आणखी काही देता येईल का, याविषयी चर्चा झाल्या. स्वतः अनिल अग्रवालजींशी फडणवीस यांनी चर्चा केली होती. पण, मागचा काही अनुभव पदरी आलेला असताना त्यांनी प्रकल्प गुजरातला हलवण्याचं ठरवलं.”

जुन्या आठवणी आठवून देणारं ‘प्रेम म्हणजे काय असते ?’ चित्रपटाचा टिझर प्रदर्शित

उदय सामंत म्हणाले की, पंतप्रधान मोदी यांच्याशी संपर्क साधून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वेदांता-फॉक्सकॉन प्रकल्पाविषयी चर्चा केली, पंतप्रधान मोदी यांनी सांगितले की, मागच्या सात-आठ महिन्यांत हवा असलेला प्रतिसाद उद्योजकाला न मिळ्याल्याने ही परिस्थिती निर्माण झाली. पण महाराष्ट्रातील जनतेला त्यांनी आश्वासन दिलं की एवढाच किंवा यापेक्षा मोठा प्रकल्प काही दिवसांतच महाराष्ट्राला बेरोजगीरी दूर करण्यासाठी दिला जाईल असे उदय सामंत यांनी सांगितले.

Watch Video : बंगालमधील भाजप आंदोलनकर्त्यांकडून पोलिसाला बेदम मारहाण, व्हिडिओ व्हायरल

Latest Posts

Don't Miss