Saturday, July 27, 2024

Latest Posts

गोपीचंद पडळकरांनी केला जोरदार हल्लबोल, रोहित पवार बिनडोक आणि…

सध्या राज्याच्या राजकारणात अनेक घडामोडी या घडत आहेत. अश्यातच आता रोहित पवार चांगलेच चर्चेत आले आहेत.

सध्या राज्याच्या राजकारणात अनेक घडामोडी या घडत आहेत. अश्यातच आता रोहित पवार चांगलेच चर्चेत आले आहेत. तर विधानभवन परिसरात प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना गोपीचंद पडळकरांनी जोरदार टीका रोहित पवार यांच्यावर केली आहे. रोहित पवारांना (Rohit Pawar) सल्ला देणारा बेअक्कल आहे. संघर्ष यात्रा अयशस्वी झाली म्हणून रोहित पवार स्टंट करत आहेत, अशी टीका भाजप आमदार गोपीचंद पडळकरांनी (Gopicahand Padalkar) शरद पवार (Sharad Pawar) गटाचे आमदार रोहित पवारांवर केली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) शरद पवार (Sharad Pawar) गटाचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांच्या नेतृत्तवातील युवा संघर्ष यात्रेची (Yuva Sangharsh Yatra) समारोपाची सभा संपल्यानंतर विधानसभेकडे कूच करणाऱ्या कार्यकर्त्यांवर पोलिसांनी लाठीमार केला. आपल्या मागण्यांसाठी विधानसभेवर धडकणाऱ्या या यात्रेला पोलिसांनी अडवले असून त्यांना ताब्यात घेतलं आहे. पोलिसांच्या लाठीचार्जनंतर राष्ट्रवादीचे युवक कार्यकर्तेही आक्रमक झाले. त्यांनीही पोलिसांचे बॅरिकेटस् तोडून पुढे जाण्याचा प्रयत्न केला. या सगळ्या संघर्षात आमदार रोहित पवार यांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले होते.

या संदर्भात बोलत असताना गोपीचंद पडळकर म्हणाले आहेत की, रोहित पवारांनी संघर्ष बघितला कधी? संघर्ष आणि रोहित पवार यांचा संबंध काय? असा सवाल पडळकरांनी रोहित पवारांना केला आहे. रोहित पवार बिनडोक माणूस आहे. त्यांना जो सल्ला देतो तो देखील बेअक्कल आहे. रोहित पवारांनी संघर्ष बघितला कधी? राज्यात त्यांच्या संघर्ष यात्रेला कुठेच रिस्पॉन्स मिळाला नाही. संघर्ष यात्रा फेल झाली म्हणून काहीतरी स्टंट करायचा . यात्रा अपयशी ठरली त्यामुळे त्यांनी हा केविलवाणा प्रयत्न केला आहे. पीएचडी करून तरूण मुलं करतात काय? काय दिवे लावतात?, अशी मिश्किल टिपण्णी अजित पवार यांनी केली. मी सभागृहात नव्हतो त्यामुळे मला काही माहिती नाही, असे म्हणत उत्तर देणे टाळले आहे.

हे ही वाचा : 

पायल रोहतगीने पठाण चित्रपटाला समर्थन देत सनी लियोनवर साधला निशाणा

‘आभाळमाया’ फेम अभिनेते पराग बेडेकर यांच वयाच्या ४७ व्या वर्षी झाल हृदयविकाराच्या झटक्याने निधन

‘आभाळमाया’ फेम अभिनेते पराग बेडेकर यांच वयाच्या ४७ व्या वर्षी झाल हृदयविकाराच्या झटक्याने निधन

Follow Us
टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss