Saturday, July 27, 2024

Latest Posts

सरकार गुन्हा दाखल करतो आणि देवेंद्र फडणवीस मात्र.. काय म्हणाले SANJAY RAUT

पुण्यात माध्यमांशी बोलतांना खासदार संजय राऊत यांनी आमचं सरकार आल्यावर तुम्हालाही कारवाईला सामोरं जावं लागेल असं मत व्यक्त केलं आहे. कारवाया होतील म्हणून आमच्या पक्षातील पळकूटे पळवून नेले. नितीश कुमार सुद्धा गेले त्यामागचं कारण हेच आहे. रवींद्र वायकर, किशोरी पेडणेकर, माझ्या भावाला देखील दोन ते तीन लाखासाठी ईडीची नोटीस आली आहे. ईडी भारतीय जनता पार्टीची एक्सटेंडेट ब्रान्च आहे. हे जे चित्र आहे हे देशासाठी चांगलं नसल्याचे संजय राऊत यावेळी म्हणाले.

सरकार गुन्हा दाखल करतो आणि मग देवेंद्र फडणवीस…

INS विक्रांत घोटाळा, विक्रांत बचावाच्या नावाखाली क्राउड फंडिंगकडून कोट्यावधी रुपयांचा गंडा घातला. त्याचा गुन्हा दाखल झाला, कोर्टाने जामीन नाकारला त्याचा आणि त्यांच्या मुलाचा. ते भुमीगत झाले, त्यानंतर त्यांनी सरकार आल्यावर जामीन मॅनेज केला. ईडी तेथेही येऊ शकली असती. भारतीय जनता पार्टीचा एक लफंगा पैसे गोळा करतो, सरकार गुन्हा दाखल करतो आणि मग देवेंद्र फडणवीस गुन्हा मागे घेतात. हा कोट्यावधी रुपया अपहार आहे. दोन एक हजार रुपये जमा केले म्हणुन तृणमूल काँग्रेसचे सध्याचे खासदार साकेत गोखले यांना ईडीने अटक केली. मग हा मुलुंडचा नागडा पोपटलाल मोकळा कसा? जे भारतीय जनता पार्टीत नाहीत त्यांना अशा प्रकारे त्रास द्यायचा. हे जे चाललं आहे त्यामागे मुलुंडचा नागडा माणूस आहे, पोपटलाल असे संजय राऊत म्हणाले.

त्यांना राजकीय सुडबुद्धीतून त्रास दिला जातोय

दौंड प्रकरण सांगतोय ५०० कोटीचं मनीलॅाड्रींग भाजपचा राहुन कुल करतोय. अजित पवार७० हजार कोटीचा सिंचन घोटाळा, असं प्रधानमंत्री सांगतात. शिखर बँक घोटाळा, प्रफुल पटेल यांची ४५० कोटीची प्रॅापर्टी जप्त केली. हे प्रधानमंत्री, अमित शहा सांगत असल्याचे खासदार राऊत यांनी सांगितले. हसन मुश्रीफ, छगन भुजबळ सुटले ना? मग आमचे शिवसेनेचे नेते आणि राष्ट्रवादीचे रोहित पवार आहेत त्यांना राजकीय सुडबुद्धीतून त्रास दिला जातोय. आम्ही झुकणार नाही, काय करणार तुंरुगात टाकणार का? एकदा टाकलंत परत टाका. भावना गवळी जामीनावरचं सुटल्या ना? नितीश कुमार यांच्या पक्षाच्या रिर्झव्हवरती १० दिवसांपुर्वी ईडीने धाडी टाकल्या होत्या. तेव्हा ते घाबरले. कारवाया करुन घ्या, आमची पण सत्ता येईल. तुम्हालाही कारवाईला सामोरं जावं लागेल, असा इशारा संजय राऊत यांनी माध्यमांशी बोलतांना दिला.

हे ही वाचा:

‘बिग बॉस १७’च्या ट्रॉफीचा मानकरी ठरला मुनव्वर फारुकी,खास पोस्ट केली शेअर

मनसे अध्यक्ष राज ठाकरे गुरुवारपासून नाशिक दौऱ्यावर

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss