Sunday, May 19, 2024

Latest Posts

मलाही मुख्यमंत्री व्हावं वाटतंय – रामदास आठवले

Ramdas Athawale : महाराष्ट्राच्या राजकारणात कोण पुढचा मुख्यमंत्री होणार या चर्चांना प्रचंड उदान आलं आहे. काही दिवसांपूर्वी विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) राष्ट्रवादीला राम राम ठोकून भाजपमध्ये जाणार आणि राज्याचे मुख्यमंत्री होणार अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली होती

Ramdas Athawale : महाराष्ट्राच्या राजकारणात कोण पुढचा मुख्यमंत्री होणार या चर्चांना प्रचंड उदान आलं आहे. काही दिवसांपूर्वी विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) राष्ट्रवादीला राम राम ठोकून भाजपमध्ये जाणार आणि राज्याचे मुख्यमंत्री होणार अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली होती. त्यानंतर स्वतः अजित पवारांनी माध्यमांसमोर येत या सगळ्या चर्चांना पूर्णविराम लावला होता. त्यांनतर अजूनही अजित पवारांचे भावी मुख्यमंत्री म्हणून बॅनर महाराष्ट्रभर लागताना पाहायला मिळत आहे. मुख्यमंत्रीपदावरुन राज्यात सुरु असलेली चढा ओढ सुरु असताना या वादात आता केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले (Ramdas Athawale) यांनीही उडी मारली आहे.

आपल्या कवितांमुळे कायमच चर्चेत असणारे केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवलेंनी ‘मलाही मुख्यमंत्री व्हावसं वाटतंय’ असं वक्तव्य केल्याने राजकीय वर्तुळात अनेक उलट सुलट चर्चा रंगू लागल्या आहेत. भावी मुख्यमंत्री म्हणून पोस्टर लागणे हे हास्यास्पद असल्याचं रामदास आठवले म्हणाले आहेत. सांगली दौऱ्यावर असताना पत्रकार परिषदेत माध्यमांशी संवाद साधताना रामदास आठवले यांनी आपली इच्छा व्यक्त केली आहे.

यावेळी रामदास आठवले यांनी अजित पवारांवर देखील भाष्य केलं आहे. ‘अजितदादांना तिकडे संधी मिळेल असे वाटत नाही. आम्हाला अजितदादांची आवश्यकता नाही’ अशी स्पष्ट प्रतिक्रया रामदास आठवले यांनी दिली. अजित पवार आणि सुप्रिया सुळे यांच्यात मुख्यमंत्रीपदासाठी चढाओढ सुरु असल्याचं आठवले यावेळी म्हणाले सोबतच एकनाथ शिंदे मुख्यमंत्री (CM Ekanath Shinde)असेपर्यंत कोणालाही ती संधी मिळणार नसल्याचं महत्त्वपूर्ण विधान आठवले यांनी केलं आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्याकडून होत असलेल्या टीकेवर बोलताना उद्धव ठाकरेंनी भान ठेवून बोलावं असं वक्तव्य देखील यावेळी आठवले यांनी केलं आहे. केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवलेंच्या या वक्तव्यानंतर राजकीय नेत्यांकडून काय प्रतिक्रिया येतात हे पाहणं देखील महत्त्वाचं ठरणार आहे.

हे ही वाचा : 

भाजपला सुचले तीन वर्षांनंतर शहाणपण, राऊतांची बोलंदाजी निष्प्रभ करण्यासाठी ‘राणेस्र’

बारसू रिफायनरी प्रकल्पाला अजित पवार यांची भूमिका

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

Latest Posts

Don't Miss