Friday, March 1, 2024

Latest Posts

अनौपचारिक गप्पांमध्ये अजित पवारांनी केला मोठा गौप्यस्फोट, म्हणाले…

सध्या राज्याच्या राजकारणात अनेक कोठ मोठ्या घडामोडी या घडत आहेत. अजित पवार (Ajit Pawar) शरद पवारांची (Sharad Pawar) साथ सोडून भाजपसोबत सत्तेत गेले तेव्हापासून, अजित पवार वारंवार गौप्यस्फोट करत आहेत.

सध्या राज्याच्या राजकारणात अनेक कोठ मोठ्या घडामोडी या घडत आहेत. अजित पवार (Ajit Pawar) शरद पवारांची (Sharad Pawar) साथ सोडून भाजपसोबत सत्तेत गेले तेव्हापासून, अजित पवार वारंवार गौप्यस्फोट करत आहेत. आताही त्यांनी या गौप्यस्फोटाच्या मालिकेत आणखी एक भर टाकलीय.

नुकताच अजित पवार यांनी एक मोठा अंडी महत्वपूर्ण गौप्यस्फोट हा केला आहे. सत्तेत सहभागी होण्याआधीच अर्थखातं मागितलं होत, अशी माहिती अजित पवार यांनी दिलीय. देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना अर्थखातं स्वत:कडेच हवं होतं, मात्र आपल्या आग्रहामुळे, अर्थखात मिळालं, असे ही अजित पवार म्हणालेत. त्याचसोबत, शरद पवारांनी आता आराम करावा, असा सल्लाही अजित पवार यांनी दिलाय.

शरद पवार यांनी घरी बसून आराम करावा, आम्ही हेच सांगत होतो, पण ते आराम करत नव्हते. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीनंतर काँग्रेस पृथ्वीराज चव्हाण यांना मुख्यमंत्रिपदावरून हटवणार होती. त्यांच्याऐवजी विखे पाटील, बाळासाहेब थोरात किंवा हर्षवर्धन पाटील यांना मुख्यमंत्री करण्याचा काँग्रेसचा विचार होता. याबाबत राष्ट्रवादीबरोबर चर्चाही झाली होती. पण पृथ्वीराज चव्हाण यांनी दिल्लीला धाव घेतली, राहुल गांधींना भेटून ऐनवेळी पद वाचवले, असेही अजित पवार म्हणाले. सर्वात चांगले मुख्यमंत्री विलासराव देशमुख होते, असेही ते म्हणाले.

सत्तेत सहभागी होण्यापूर्वीच आपल्याला वित्त खाते हवे असल्याची भुमिका अमित शाह यांच्या समोरं मांडली होती. त्यावेळी देवेंद्र फडणवीस यांना त्यांच्याकडेच वित्त खाते असावे अशी भावना होती. परंतु माझ्या आग्रहामुळे अर्थ खाते माझ्याकडे आले. परंतु देवेंद्र फडणवीस हे माजी मुख्यमंत्री आहेत. त्यामुळं प्रोटोकॉल नुसार ते वरिष्ठ असल्याने सुरुवातीला फाईल माझ्याकडे येईल त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांच्याकडे जाईल आणि मगच मुख्यमंत्र्यांकडे जाईल असा निर्णय झाला. तशी माझीच भुमिका होती असं ही अजित पवार म्हणाले.

Latest Posts

Don't Miss