Monday, April 22, 2024

Latest Posts

VBA चा महाविकास आघाडीत समावेश, Sanjay Raut यांच्याकडून पत्र जाहीर

कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी त्यांच्या समाज माध्यमावर एक पत्र प्रसिद्ध केले आहे. ज्यामध्ये वंचित बहुजन आघाडीने यापुढे अधिकृतपणे महाविकास आघाडीत सामील व्हावे, अशी भूमिका असल्याचे म्हटले आहे. ॲड.बाळासाहेब आंबेडकर यांना दिलेल्या या पत्रकावर कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांची सही आहे.

आंबेडकर यांनी भारताला संविधान दिले

देश अत्यंत गंभीर परिस्थितीतून मार्गक्रमण करीत आहे. महान लोकशाही परंपरा असलेला देश हुकूमशाहीकडे जातो आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी भारताला महान संविधान दिले. व्यक्ती स्वातंत्र्य व लोकशाहीचा पुरस्कार केला. आज हे सर्व पायदळी तुडवले जाते आहे. २०२४ साली देशात झुंडशाहीने वेगळा निकाल लावला तर बहुदा ही शेवटचीच निवडणूक ठरेल, अशी शंका लोकांना वाटते. ही परिस्थिती बदलून राज्यात व देशात परिवर्तन घडवावे, यासाठी महाविकास आघाडी ची स्थापना झाली, हे आपण जाणताच. आपण स्वतः देशातील हुकूमशाही विरुद्ध लढत आहात. आम्ही त्याबद्दल आपले आभारी आहोत. वंचित बहुजन आघाडीने यापुढे अधिकृतपणे महाविकास आघाडीत सामिल व्हावे, अशी आमची भूमिका आहे.

वंचित बहुजन आघाडीने महाविकास आघाडीत सामिल व्हावे

दि. ३० जानेवारी रोजी मुंबई येथे झालेल्या महाविकास आघाडीच्या बैठकीत आपल्या सुचनेनुसार, वंचित बहुजन आघाडीचे प्रतिनिधी सहभागी झाले. वंचित बहुजन आघाडीने महाविकास आघाडीत सामिल व्हावे, यावर शिवसेना, काँग्रेस तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे एकमत झाले असून, त्यानुसार वंचित बहुजन आघाडीचा महाविकास आघाडीत समावेश केला आहे.

Image

याबाबत खासदार संजय राऊत यांनी सोशल मिडीयाच्याद्वारे वंचित बहुजन आघाडीचा आज महाविकास आघाडीत समावेश झाला. ॲड.बाळासाहेब आंबेडकर हे २ फेब्रुवारी रोजी महाविकास आघाडीच्या बैठकीत सहभागी होतील. वंचितमुळे देशातील हुकूशाहीविरोधी लढ्याला नक्कीच बळ मिळेल. भारताचे संविधान धोक्यात आहे. एकत्र येऊन संविधान वाचवावे लागेल. अशा आशयाची पोस्ट लिहित पत्रकाचा फोटो सोबत जोडला आहे.

हे ही वाचा:

अंदमानची टूर आणि दुरावा,प्रथमेशला भेटण्यासाठी मुग्धाची लगबग

महाराष्ट्रातील किल्ल्यांचा युनेस्कोकडे नामांकनासाठी प्रस्ताव – Cm Eknath Shinde

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss