Sunday, May 19, 2024

Latest Posts

भारत गुंतवणुकीसाठी एक आकर्षक ठिकाण, मोदींनी मांडली भारताच्या आर्थिक परिवर्तनाची गोष्ट

मोदींनी २०१४ पासून भारताने कशी विकासाच्या दिशेने वाटचाल केली आणि जागतिक पातळीवर भारत गुंतवणूकीसाठी आकर्षक ठिकाण असल्याची त्यांनी स्पष्ट केलं.

आज इंदौरमध्ये मध्य प्रदेश सरकारने ‘इन्व्हेस्ट मध्य प्रदेश’ या जागतिक गुंतवणूकदार परिषदेचे आयोजन केले आहे. या कार्यक्रमाचे उदघाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी मोदींनी २०१४ पासून भारताने कशी विकासाच्या दिशेने वाटचाल केली आणि जागतिक पातळीवर भारत गुंतवणूकीसाठी आकर्षक ठिकाण असल्याची त्यांनी स्पष्ट केलं.

यावेळी ते म्हणले,”राजकीय स्थैर्य आणि गेल्या आठ वर्षांत सातत्यानं केलेल्या सुधारणांमुळे भारत गुंतवणुकीसाठी एक आकर्षक ठिकाण बनलं आहे, जागतिक अर्थव्यवस्थेवर लक्ष ठेवणाऱ्या संस्था तसंच विश्वसनीय दुवा म्हणून भारताकडे पाहिलं जात आहे, असंही ते म्हणाले. आर्थिक सहकार्य आणि विकास संघटनेने (ओईसीडी) भारताबाबत बोलताना सर्वात वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था आहे असं म्हटलं,” असल्याचं देखील मोदींनी यावेळी सांगितलं.

“२०१४ पासून देशात सुधारणा, परिवर्तन आणि उत्तम कामगिरी करण्यात आली आहे. कोविड-१९ च्या संकटा काळात देखील भारताने सुधारणांचा मार्ग सोडला नाही. “आत्मनिर्भर भारत” मोहिमेने देशातील सुधारणांना मोठी गती मिळाली. परिणामी, आज भारत हे गुंतवणुकीसाठी एक आकर्षक ठिकाण बनले आहे”, असं म्हणत त्यांनी भारताचे कौतुक केले.

मजबूत लोकशाही, राजकीय स्थैर्य आणि तरुण मानवी संसाधनामुळे भारताप्रती गुंतवणूकदार आशावादी असल्याचं दिसून येत, असंही पंतप्रधान म्हणाले. यावेळी ते म्हणाले,”जागतिक अर्थव्यवस्थेवर बारकाईनं लक्ष ठेवणाऱ्या संस्थांनी भारतावर विश्वास दाखवला आहे. तसेच आंतरराष्ट्रीय गुंतवणूकदारांनीही देशाबद्दल असाच आशावाद कायम राखला आहे”, असं मोदींनी म्हटलं.

तसेच, आंतरराष्ट्रीय संस्था भारताबद्दल आशावादी आहेत हे लक्षात घेऊन पंतप्रधान मोदी म्हणाले की,”आंतरराष्ट्रीय नाणेनिधी (IMF) हे भारताच्या मजबूत आर्थिक मूलभूत गोष्टींमुळे देशाला जागतिक अर्थव्यवस्थेत “उज्ज्वल स्थानी” पाहते. तसेच जागतिक बँकेनेही आंतरराष्ट्रीय स्तरावर भारत अधिक चांगल्या स्थितीत असल्याचं म्हटलं आहे.

यापुढे मोदी म्हणाले,”भारत जागतिक समूहातील सर्वात वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था असल्याचं मत ऑर्गनायझेशन फॉर इकॉनॉमिक को-ऑपरेशन अँड डेव्हलपमेंट (OECD) ने व्यक्त केलं आहे. भारताकडे सध्या G20 चे अध्यक्षपद देखील आहे. एका नामांकित बँकेने नुकत्याच केलेल्या सर्वेक्षणातून असे समजले आहे की, बहुतांश गुंतवणूकदारांनी गुंतवणुकीसाठी भारताला पसंती दिली असून भारतात थेट परकीय गुंतवणूक (FDI) दररोज नवनवीन विक्रम रचत आहे, असेही पंतप्रधान मोदी म्हणाले.

हे ही वाचा:

थलपथी विजयचा चित्रपट वारिसू झाला लीक, या साइट्सवरून करता येतोय डाउनलोड

न्यूझीलंड क्रिकेटसंघात पसरली शोककळा, ‘या’ दिग्गज खेळाडूने जगाचा निरोप घेतला

हसन मियाँला आता धर्म आठवला का? सोमय्यांचा मुश्रिफांना सवाल

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss