मराठा आरक्षणाच्या मुद्यावरून राज्यात वातावरण तापलेलं आहे, त्यावरून लोकं एकमेकांवर टीका करत आहेत. यावरूनच आता ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी देखील जोरदार निशाणा साधला आहे.
यावेळी माध्यमांशी बोलत असताना संजय राऊत म्हणाले आहेत की, महाराष्ट्राची परंपरा आहे लिमिटच्या बाहेर गेलेल्या लोकांचा करेक्ट कार्यक्रम होतो असं मुख्यमंत्री सांगतात तसं, महाराष्ट्रातील जनता २०२४ च्या निवडणुकीत लिमिटच्या बाहेर गेलेल्या लोकांचा करेक्ट कार्यक्रम करणार आहे. या राज्यात सगळ्यांच गोष्टी लिमिटच्या बाहेर गेलेल्या आहेत. महाराष्ट्रातलं सामाजिक स्वास्थ बिघडता कामा नये, पुरोगामी महाराष्ट्राला कोणतेही गालबोट लागता कामा नये. महाराष्ट्राची जी भाषा बिघडलेली आहे, त्याची सुरुवात देवेंद्र फडणवीस यांच्या पासुन झालेली आहे. फडणवीस यांनी महाराष्ट्राची सूत्र हातात घेतल्यावर महाराष्ट्राचे संस्कृती आणि भाषा बिघडायला सुरुवाता झाली. जी भाषा जरांगे पाटलांनी वापरली त्याचं समर्थन कोणीही करणार नाही. परंतु भाजपाचे भाडोत्री लोक ज्या प्रकारची भाषा विरोधी पक्षातील नेत्यांना वापरतात त्यांचे समर्थन फडणवीस आणि करेक्ट कार्यक्रम करणारे करणार आहेत का ? आज मराठी भाषा दिन आहे, त्यामुळे त्यांनी आपल्या लोकांना मराठी भाषेचे आणि संस्कृतीचे धडे द्यावेत.
तसेच राऊत पुढे म्हणाले आहेत की, नारायण तातू राणे आणि त्यांची पोर कुठल्या प्रकारची भाषा वापरतात. भाजप आणि शिंदे यांची लोक कोणत्या प्रकारचे भाषा वापरतात. सरकारच्या लोकांनी आत्मचिंतन केलं पाहिजे. त्यांनी आत्मचिंतन केलं तर मराठी भाषा आपोआप शुद्ध होईल. नरेंद्र मोदींवर यांच्यावर प्रधानमंत्री म्हणुन आम्ही टिका केली , आम्ही त्यांच्यावर वैयक्तिक टीका केली नाही. हे राज्य कायद्याचं आहे. सरकारला वाटत असेल की एखाद्या नेत्यामुळे कायदा व सुव्यवस्थेचं उल्लंघन होईल ,तर त्याच्यावर कारवाई करण्याचा अधिकार सरकारला आहे . पण ही वेळ महाराष्ट्रावर कोणी आणि का आणली, याची चौकशी केली पाहिजे. आजही मराठा जनतेला का ? वाटतं की त्यांची फसगत झाली आहे. त्यातून हा उद्रेक सुरू असेल तर ठीक आहे. गुन्हे दाखल होतात आंदोलनामध्ये, पण ही वेळ का आली? जाती-जातीमध्ये आग लावण्याचा काम कोणी केलं. इतकं दुभंगलेलं राज्य कधीच नव्हतं, हे फडणवीस यांच्या काळात झालं. हे भाजपाचे राजकारण आहे असं देखील राऊत म्हणाले आहेत.
हे ही वाचा:
फक्त आजच नाही तर ३६५ दिवस ‘मराठी भाषा गौरव दिन’ साजरा व्हायला हवा – Raj Thackeray
मुंबईत आज पाणीपुरवठा बंद; काही भागात १०० टक्के तर ३० टक्के पाणीपुरवठा बंद