Tuesday, April 23, 2024

Latest Posts

जयंत पाटील यांची पहिली प्रतिक्रिया, पवारसाहेब जिथे उभे राहतील तिथे पक्ष उभा राहील

महाराष्ट्राच्या राजकारणातील आताच्या घडीची सर्वात मोठी बातमी नुकतीच समोर आली आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाकडून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं नाव आणि चिन्हावर आज निकाल जाहीर करण्यात आला आहे.

महाराष्ट्राच्या राजकारणातील आताच्या घडीची सर्वात मोठी बातमी नुकतीच समोर आली आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाकडून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं नाव आणि चिन्हावर आज निकाल जाहीर करण्यात आला आहे. निवडणूक आयोगाने याबाबत अतिशय मोठा आणि ऐतिहासिक असा निर्णय दिला आहे. या निकालात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या गटाचा मोठा पराभव झाला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गटाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं नाव आणि घड्याळ चिन्ह देण्यात आलं आहे. अजित पवार गटासाठी हा सर्वात मोठा दिलासा आहे.

शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील यांनी त्यांची पहिली प्रतितिक्रिया ही दिली आहे. ट्विट करत त्यांनी त्यांची पहिली प्रतिक्रिया ही दिली आहे. निवडणूक आयोगाचा हा निर्णय धक्कादायक आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे संस्थापक तथा राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय @PawarSpeaks साहेबांच्या हातातून पक्ष हिसकावून घेतला जातोय. देशातील जवळपास सर्वच संविधानिक संस्थांनी स्वायत्तता गमावली असल्याने तर्कहीन निर्णय देऊन तांत्रिक कारणे पुढे केली गेलेली सकृतदर्शनी दिसत आहे. या निकालाचा सविस्तर अभ्यास करुन आम्ही त्यावर भाष्य करू. या निकालाला आम्ही सर्वोच्च न्यायालयात आव्हान देणार असून देशाचे सर्वोच्च न्यायालय आम्हाला न्याय देईल याची आम्हाला खात्री आहे.

आजपर्यंत शरद पवारांनी अनेकांना उभं केलं, आमच्यासारख्या अनेकांना मंत्रिपदं दिली, आणि आज त्यांच्याच हातातून हा पक्ष काढून घेतला जातोय. आम्ही सर्वोच्च न्यायालयात दाद मागणार असून न्यायालयाकडून शेवटची अपेक्षा आहे असं जयंत पाटील म्हणाले.

नाना पटोले यांची प्रतिक्रिया –

तर दुसरीकडे काँग्रेसचे नाना पटोले यांनी देखील त्यांची प्रतिक्रिया ही दिली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि चिन्ह अजित पवार यांना देण्याचा निवडणूक आयोगाचा निर्णय केंद्र सरकारने लिहून दिलेला आहे, निवडणूक आयोगाने तो फक्त जाहीर केला. काही महिन्यांपूर्वी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी देशात एकही प्रादेशिक पक्ष अस्तित्वात राहणार नाही असे म्हटले होते. त्यानंतर केंद्रीय गुप्तचर संस्था आणि निवडणूक आयोगाने मोदी सरकारच्या आदेशाने प्रादेशिक पक्ष संपवण्याची सुरुवात केली आहे. अगोदर शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासोबत जे झाले ते लोकशाहीची हत्या करण्याचाच प्रकार आहे. मोदी सरकार आणि निवडणूक आयोग केवळ विरोधी पक्षच नाही तर या देशातील लोकशाही संपवत आहे.

अजित पवारांसोबत किती आमदार?

– महाराष्ट्रातील ४१ आमदार
– नागालँडमधील ७ आमदार
– झारखंड १ आमदार
– लोकसभा खासदार २
– महाराष्ट्र विधानपरिषद ५
– राज्यसभा १

शरद पवारांसोबत किती आमदार?

महाराष्ट्रातील आमदार १५
केरळमधील आमदार १
लोकसभा खासदार ४
महाराष्ट्र विधानपरिषद ४
राज्यसभा – ३

हे ही वाचा:

मराठा, धनगर, मुस्लिम आरक्षणाच्या प्रश्नावर संसदेत लक्ष वेधले, सुप्रिया सुळे

व्हॅलेंटाईन डे निमित्त करण जोहरची ‘लव्ह स्टोरीज’ सिरीज लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss