Saturday, June 3, 2023

Latest Posts

Karnataka Assembly election 2023 Result, कर्नाटकात सत्तापालट, काँग्रेसचा दणदणीत विजय

कर्नाटकात काँग्रेस बाजी मारणार की भाजप सत्तेत कायम राहणार याची उत्सुकता ही सर्वांना लागली होती. संपूर्ण देशाच कर्नाटकच्या निकालाकडे लक्ष हे लागले होते. परंतु कर्नाटकात काँग्रेसचा दणदणीत विजय हा झाला आहे. सकाळी मतमोजणीला सुरुवात झाली आणि पहिल्या अर्ध्या तासातच कर्नाटकाचे चित्र हे स्पष्ट झाले आहे. काँग्रेस आणि भाजपमध्ये काँटे की टक्कर असल्याचे चित्र देखील काही क्षणांपुरते दिसून आले होते. एकीकडे काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचा जल्लोष हा सुरु आहे तर दुसरीकडे काँग्रेसच्या सर्व उमेदवारांना बंगळुरुमध्ये हलवण्यात येणार आहे.

काँग्रेस 134 जागांवर आघाडीवर आहे. तर भाजपला 67 जागांवर समाधान मानावं लागत आहे. जेडीएस 19 जागांवर पुढे आहे. तर अपक्ष आणि इतर 4 जागांवर आघाडीवर आहेत.

तसेच काँग्रेसच्या सर्व उमेदवारांना बंगळुरुमध्ये हलवण्यात येणार आहे. कर्नाटकमध्ये सुरुवातीच्या कलांमध्ये काँग्रेसनं आघाडी घेतली आहे. त्यानंतर काँग्रेसमधील घडामोडींना वेग आला आहे. बहुमत न मिळाल्यास सर्व आमदारांना अज्ञातस्थळी हलवण्यात येणार आहे. या सर्व उमेदवारांना हैद्राबाद ला हलवण्यात येणार आहे असे देखील समोर आले आहे. तर कर्नाटकमध्ये काँग्रेसने जोरदार मुसंडी घेतली आहे. सुरुवातीच्या कलामध्ये काँग्रेसनं बहुमताचा आकडा गाठला आहे. यानंतर काँग्रेसच्या दिल्लीतील कार्यालयात आनंदोत्सव साजरा केला जात आहे. फटाके ढोल वाजवून आनंद व्यक्त केला जात आहे.

Latest Posts

Don't Miss