Wednesday, April 24, 2024

Latest Posts

Karnataka Assembly election 2023 Result, पहिल्या अर्ध्या तासातच कर्नाटकातील चित्र स्पष्ट, काँग्रेस आणि भाजपमध्ये काँटे की टक्कर

कर्नाटकात काँग्रेस बाजी मारणार की भाजप सत्तेत कायम राहणार याचा अखेर फैसला अवघ्या काही तासांवर आला आहे.

Karnataka Assembly Elections 2023 : कर्नाटकात काँग्रेस बाजी मारणार की भाजप सत्तेत कायम राहणार याचा अखेर फैसला अवघ्या काही तासांवर आला आहे. अवघ्या पहिल्या अर्ध्या तासतात कर्नाटकाचे चित्र हे स्पष्ट झाले आहे. काँग्रेस आणि भाजपमध्ये काँटे की टक्कर असल्याचे दिसून येत आहे तर काँग्रेस आघाडीवर असल्याचे दिसत आहे.

आजचा दिवस हा कर्नाटक राज्याच्या दृष्टीनं अतिशय महत्वाचा आहे. मत मोजणीला सुरुवात झाली आहे आणि जवळपास २०० जागांचे कल हे हाती आले आहेत. यामध्ये काँग्रेस आणि भाजपमध्ये मोठी टक्कर ही पाहायला मिळत आहे. काँग्रेस १०९ आणि भाजप ८३ जागांवर आघाडीवर असल्याचे चित्र दिसत आहे. कल सातत्यानं बदलत आहेत. सध्या भाजपचे ८ कॅबिनेट मंत्री हे पिछाडीवर आहेत. सकाळी ८.३८ च्या सुमारास ट्रेंडमध्ये काँग्रेसने ११३ जागांवर आघाडी घेतली होती. २२४ जागांच्या विधानसभेत बहुमतासाठी ११३ जागांची आवश्यकता असेल. मात्र, काँग्रेसला आपली आघाडी जास्त काळ टिकवता आली नाही आणि पुन्हा एकदा १०० च्या खाली आली.

सध्याच्या घडीच्या काही महत्वाचे मुद्दे –

आकडे सातत्याने बदलतात
कर्नाटकमध्ये सुरुवातीच्या कलात काँग्रेसला बहुमत, ११३ जागांवर आघाडी
मुख्यमंत्री बसवराज बोम्मई आघाडीवर
भाजपची ,मोठी पिछाडी
भाजपचे ८ कॅबिनेट मंत्री हे पिछाडीवर
एकीकरण समितीचे उमेदवार पिछाडीवर
जेडीयुचे नेते व माजी मुख्यमंत्री कुमारस्वामी पिछाडीवर
दोन माजी मुख्यमंत्री पिछाडीवर
माजी मुख्यमंत्री कुमारस्वामी पिछाडीवर
माजी मुख्यमंत्री जगदीश शेट्टर पिछाडीवर

दिनांक १० मे रोजी कर्नाटकात मतदान हे मतदान झाले आहे. आज दिनांक १३ मे रोजी कर्नाटक विधानसभा निवडणुकीचा (Karnataka Assembly Election Result 2023) निकाल हा लागणार आहे. आज सकाळी ८ वाजता मतमोजणीला सुरुवात होईल. सुरुवातीला टपाली मतमोजणी होईल. त्यानंतर ईव्हीएम मशीन उघडल्या जातील. आज साधारणतः दुपारी १२ वाजेपर्यंत निवडणुकीचे कल हाती येतील. तर बेळगावातील १८ मतदारसंघातील निकाल हे दुपारी दोन वाजेपर्यंत जाहीर होतील. त्यामुळे कर्नाटक कुणाच्या हाती जाणार? गुलाल कोण उधळणार? याचे चित्र स्पष्ट अवघ्या काही तासांत स्पष्ट होणार आहे. राज्यात मतदानासाठी ५८,५४५ मतदान केंद्र तयार करण्यात आले होते. या निवडणुकीत २,६१५ उमेदवार उभे आहेत. त्यामध्ये २,४३० पुरुष तर १८४ महिला उमेदवार आणि १ तृतीयपंथीय उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. या उमेदवारांच्या भाग्याचा फैसला ५.३१ कोटी मतदारांनी केला असून तो ईव्हीएम मशीनमध्ये बंद आहे. राज्यात ७३.१९ टक्के मतदान झालं. त्यामुळे सत्ताधारी भाजपची धाकधूक वाढली आहे.

हे ही वाचा:

मुख्यमंत्री हा भारतीय जनता पक्षाच्या हातचे बाहुले… ; नाना पटोले

KBC 14 Birthday Special : केबीसीच्या मंचावर जया बच्चन नेमकं काय बोलल्या?, ज्यामुळे बिग बी रडले, पाहा व्हिडिओ

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss