Saturday, May 18, 2024

Latest Posts

किरिट सोमय्या यांनी केला उद्धव ठाकरे गटावर आरोप

भाजपा नेते, किरीट सोमय्या पुन्हा एकदा राजकीय मैदानात आले आहेत. काही दिवसांपूर्वी किरीट सोमय्यांचा कथित आक्षेपार्ह व्हिडिओ व्हायरल झाला होता.

भाजपा नेते, किरीट सोमय्या पुन्हा एकदा राजकीय मैदानात आले आहेत. काही दिवसांपूर्वी किरीट सोमय्यांचा कथित आक्षेपार्ह व्हिडिओ व्हायरल झाला होता. त्यामुळे ते अडचणीत सापडले होते. या प्रकरणाची चौकशी सुरु आहे. त्यानंतर काही दिवस त्यांनी कोणत्याही घडामोडींनी भाष्य केलं नव्हतं. त्यानंतर आता किरीट सोमय्या यांनी पुन्हा एकदा आर्थिक घोटाळे समोर आणण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. आता किरीट सोमय्या यांनी ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप केला आहे. कोरोना काळात उद्धव ठाकरे यांच्या सरकारकडून मुलुंड येथील कोविड सेंटरमध्ये १०० कोटींचा घोटाळा केल्याचा आरोप किरीट सोमय्या यांनी केला आहे.

दरम्यान किरीट सोमय्या यांनी एक ट्विट केलं आहे. यामध्ये त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. ‘उद्धव ठाकरे व महाराष्ट्र सरकारने रिचार्डसन क्रूडास या भारत सरकारच्या कंपनीकडून मुलुंड येथील जागा ताब्यात घेतली. सिडकोला तात्पुरते हॉस्पिटल बांधून देण्याचे आदेश दिले. सिडकोने ओक्स मॅनेजमेंट कॅन्सल्टन्सी कंपनीला १८५० खाटांचे हॉस्पिटल बांधण्याचे आदेश दिले. ओक्स मॅनेजमेंट कॅन्सल्टन्सी कंपनी एक इव्हेंट मॅनेजमेंट कंपनी होती. ७ जुलै २०२० ते ३१ जुलै २०२२ असे २५ महिने हॉस्पिटल चालू ठेवण्यात आले. त्यासाठी भाड्यापोटी ओक्स मॅनेजमेंट कॅन्सल्टन्सी कंपनीला ९० कोटी रुपये देण्यात आले. बांधकामासाठी १० कोटी रुपये दिले असे मिळून १०० कोटींचा घोटाळा उद्धव ठाकरे यांनी केल्याचा आरोप किरीट सोमय्या यांनी केला आहे.

रिचार्ड्सन कृडास कंपनी कडून भाड्याने घेण्यात आलेल्या जमिनीचा एकही पैसा देण्यात आला नाही असाही आरोप किरीट सोमय्या यांनी केला आहे. या संदर्भात किरीट सोमय्या यांनी मुंबई पोलीस, आयकर विभाग, ईडी कार्यालय यांना तक्रार दिली असल्याचे सांगितले आहे. या कोविड सेंटर प्रमाणे मुंबई मधील १५ कोविड सेंटरसाठी ७०० कोटी रुपये भाडे घोटाळे करण्यात आले आहेत असा सोमय्या यांचा आरोप आहे.

हे ही वाचा:

राजू शेट्टी आणि रविकांत तुपकर एकमेकांवर बरसले

उद्धव ठाकरे गटाने केला भाजपावर गंभीर आरोप

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss