संजय राऊतमध्ये जर हिंमत असेल ना तर त्यांनी पोलीस स्टेशनला जावं, न्यायालयात जावं आणि किरीट सोमय्याने विक्रांतमध्ये दमडीचा जर घोटाळा केला असेल तर त्यांनी कागदपत्रं द्यावेत, असा हल्लाबोल भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी माध्यमांशी बोलतांना केला. अर्धा डझन वेळेला उद्धव ठाकरे, ठाकरे सरकार, संजय राऊत तक्रारदारांना न्यायालयाने पोलिसांनी सांगितलं, ५७ कोटींचा आरोप एफआयआर केला. पण ५७ पैशाचाही अपव्यवहार झालेला दिसत नाही आणि तुम्ही काय त्याचे पेपर्स देत नाहीत. शेवटी उच्च न्यायालयाने पोलिसांना ठणकावलं आणि ठाकरे सरकारला सांगितलं, किरीट सोमय्या आणि नील सोमय्या यांच्या विरोधात कोणतीही कारवाई करता येणार नाही.
संजय राऊतला काय वाटतं की, किरीट सोमय्याचं जर नाव घेतलं की त्यांच्या परिवाराच्या खात्यात कोविडचे, खिचडी घोटाळ्याचे पैसे आले, पत्राचाळ घोटाळ्याचे पैसे आले? संजय राऊतचे भाऊ संदीप राऊतला ईडीने बोलावलं, मुलीच्या खात्यात पैसे गेले आहेत मग ते वाचणार का? वास्तविकरित्या, संजय राऊत आणि उद्धव ठाकरे यांच्या पोटात गोळा उठला आहे. रवींद्र वायकर ईडी कार्यालयात पोहोचले आहेत. रवींद्र वायकरला ५०० कोटींच्या बेकायदेशीर हॉटेल घोटाळ्याची परवानगी उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना दिली गेली आहे, म्हणून भीती उद्धव ठाकरे यांना वाटते. असा आरोप भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी केला आहे.
हे ही वाचा:
‘बिग बॉस १७’च्या ट्रॉफीचा मानकरी ठरला मुनव्वर फारुकी,खास पोस्ट केली शेअर
मनसे अध्यक्ष राज ठाकरे गुरुवारपासून नाशिक दौऱ्यावर