Saturday, May 18, 2024

Latest Posts

LIVE उद्धव ठाकरे : जीवाला जीव देणारे सोबती मला लाभले असे उदगार

एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर शिवसेनेमध्ये दोन गट निर्माण झाले आणि त्यानंतर त्यांनी धनुष्यबाण आणि नावासाठी देखील दावा केला होता तो सुद्धा निर्णय हा शिंदे गटाच्या बाजूने लागला.

एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर शिवसेनेमध्ये दोन गट निर्माण झाले आणि त्यानंतर त्यांनी धनुष्यबाण आणि नावासाठी देखील दावा केला होता तो सुद्धा निर्णय हा शिंदे गटाच्या बाजूने लागला. त्यामुळे शिवसेनेमध्ये दोन गट निर्माण झाले. शिवसेनेमध्ये दोन गट निर्माण झाल्यामुळे यावर्षी आपण दोन वार्डझापांदीनं साजरे करणार आहोत. त्यामुळे शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गट कडून आणि शिवसेना एकनाथ शिंदे यांचा गटाकडून वर्धापनाचे आयोजन हे करण्यात येत आहे. एकनाथ शिंदे यांना शिवसेना नाव आणि धनुष्यबाण चिन्ह हे मिळाल्यानंतरही ठाकरे गटाकडून आम्हीच मूळ शिवसेना असल्याचा दावा केला जातो याच शिवसेनेचा येत्या १९ जूनला वर्धापन दिन आहे.

शिवसेनेच्या ५७ व्या वर्धापनदिनानिमित्त ठाकरे गटाने आज शिबिराचं आयोजन करून उद्धव ठाकरे यांनी भाषणाला सुरवात केली. सामान्यांच्या मेहनतीच्या जोरावर त्याच्या उपभोग घेऊन लाचार मिंडे हे दुसरीकडे गेले आणि माझ्या हातात काही नसून देखील आत्ताच्या घडीला एवढ्या संख्येने लोक माझ्या सोबत आहे हे माझा भाग्य आहे. मला फक्त तुमच्या साठीही आणि सोबतीची गरज आहे असे केविलवाणे मत उद्धव ठाकरे यांनी भर सभेत मांडले. त्याचबरोबर उद्या शिवसेनेचा वर्धापन दिन आणो पर्वा जागतिक गद्दार दिन . आपल्या लोकांची केलेल्या गद्दारील परवा १ वारसीझ पूर्ण होईल असा टोला देखील यावेळी उद्धव ठाकरे यांनी लगावला आहे. वर्षभर लोकांकडून जो प्रतिसाद मिळतोय तो म्हणजे इतर भाषीय लोकांचा सुद्धा आम्ही नेहमी तुमच्या सोबत आहोत. कॅव्हिडच्या काळात आपण याच ठिकाणी भेटलो आणि येतेच आपण कोविद सेंटर देखील उभारला होते. तेव्हा तुम्ही आमच्या बिकट काळात साथ दिली आता आम्ही देऊ असे देखील मला सांगण्यात येते असे उद्धव ठाकरे यांनी सांगितले. हि मायबाप जनता हे माझे फरिश्ते आहे. २०१४ साली अफझल्खानाचुनि फौज आली हितो. आता पुन्हा येऊन ठेपळी आहे. दमदाटी करून , घरात येऊन फोडाफोडीचे राजकारण करू बघणाऱ्यांना उद्धव ठाकरे यांनी इशारा दिला आहे. आम्ही नामर्दाची औलाद नाही त्यामुळे राऊतांनी भाषणातून जो इशारा दिला तो एक आवाजावर महाराष्ट्रात अंमलात आणू शकतो एवढी ताकद शिवसेनेमध्ये आहे. मणिपूरमध्ये तुमच्या सत्ताधार्यांना जाऊन दाखवा आणि मग मणिपुत्रमधील जनता हि पेटवून उधळी आहे अमित शहा , नरेंद्र मोदी याना कोणी जुमानत देखील नाहीये. मणिपूर शांत करून दाखवण्याचा इशारा देखील उद्धव ठाकरे यांनी भर सभेत दिला.

आणीबाणीच्या काळातील परिस्थिती आणि जनता पक्षाच्या राजवटीचा काळ पाहता आपल्या पक्षातील वरिष्ठ नेते हे देखील होते. बाळासाहेबांनी कट्टर ८ ते १० शिवसैनिकांसमवेत मी शिवसेनेचं नेतृत्व करेन असे बाळासाहेब म्हणाले होते. त्यामुळे तेव्हा सुद्धा गद्दारांचे राजकारण होत होते. अमित शाह याना दिली अब्दालीची उपमा. जिथे एकजूट नाही तिथे आपण सर्रास ठरूच शकत नाही. त्यामुळे गद्दार देखील याचाच फायदा घेऊन फोडा आणि राज्य करा या नीतीचा अवलंब करत आहेत. महाराष्ट्रात सरकारकडून सामान्यांची लुटालूट होता आहे आणि आपण ते उघड्या डोळ्यांनी बघत आहोत. मुंबई ही महाराष्ट्र पासून तोडू शकत नाही आणि मुंबईचा महत्व आम्ही कमी होऊ देणार नाही असे उद्धव ठाकरे यांनी सांगितले. भाजपाला शिवसेनेचं महत्व कळलं नाही. पण इतर पक्षांना शिवसेनेचं महत्व कळलं आणि म्हणूनच मी पाटणाला जात आहोत असे सांगितले. उद्धव ठाकरे म्हणाले स्वातंत्राच्या प्रेमींचची एकजूट आम्ही करणार आहोत. भारतमातेच्या रक्षणासाठी सगळ्याच पक्षांना मी आव्हाहन करतो एकत्र या आणि भाजपच्या कचाट्यातून भारत मातेचं रक्षण करा.

उद्धव ठाकरे यांनीं देवेंद्र फडणवीसांना सुनावले खडे बोल, देवेंद्र फडणवीसांनी प्रश्न विचारला की ,खरं जर तुम्ही सावरकर प्रेमी असाल तर तुम्ही तुमच्या वरच्या लोकांना बापाला विचारा , करणकरां तुम्ही तुमचे बाप बदलता आमचा निदान एक तरी आहे . कारण जाहिरातीच्या गोंधळात तुमचे दुसऱ्या दिवशीच्या अनेक फोटो दिसले. त्यामुळे भाजपच्या मध्ये इतर पक्ष येत आहे ते देशाची लोकशाही अबाधित ठेवण्यासाठी होत आहे. काश्मीर प्रश्नावर , मणिपूर प्रश्नावर नरेंद्र मोदी आणि अमित शाह का नाही बोलू शकत आहे. नरेंद्र मोदी आणि अमित शाह या दोन शक्तिशाली नेत्यांनी का नाही काही केले . अजूनही कशिमर मधील पंडित असुरक्षित का आहे ? असे अनेक प्रश्न भाजपच्या पक्ष श्रेष्टीनं करण्यात आले.

सामान नागरिक कायदा जर आणणार असाल तर आधी सामान वागणु कायदा तुम्ही आधी अंमलात आणा असे मत उद्धव ठाकरे यांनी मांडले. बाळासाहेब यांनी पूर्वीच कमळाबाई असे नाव भाजपचं ठेवले हॉटेब त्यामुळे त्यांच्या वारसा हक्काच्या नात्यानेमी पुहा मंचावरून कमळाबाई असा उच्चार करत आहे. लोकांना घावबरवायचा , ईडीच्या धमक्या द्यायच्या आणि आपली अपेक्षित सामील करून घायचे . जातीय दंगली का घातडल्या नाही आमच्या सरकारमध्ये, जनआक्रोष मोर्चा काढण्यात आला. आमच्या सभा झाल्या की , गोमूत्र शिंपडून हदखवायचे ते हिंदू नाही. तुमच हिंदुत्व हे गोमूत्रामध्ये अडकलेलं आहे.

हे ही वाचा:

नाशिकमध्ये शिवसेना वर्धापन दिनानिमित्त दोन्ही गटांकडून जय्यत तयारी

पंतप्रधान नरेंद्र मोदी तामिळनाडूमधून लढवणार निवडणूक ???

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss