Monday, May 20, 2024

Latest Posts

महाविकास आघडीची सभा म्हणजे फॅमिली गॅदरिंग, हिंदू बंधू-भगिनींनो म्हणायला जीभ कचरली का? एकनाथ शिंदेनी साधला ठाकरेंवर निशाणा

देशभरात आगामी लोकसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत.

देशभरात आगामी लोकसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत. सर्वच पक्षांकडून निवडणुकीची जोरदार तयारी केली जात आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज मुंबईमध्ये पत्रकार परिषद बोलावली होती. त्यावेळी बोलताना मुख्यमंत्र्यांनी ठाकरेंवर जोरदार टीका केली आहे. तसेच त्यांनी शिवाजी पार्क येथे (Shivaji Park) इंडिया आघाडीच्या (INDIA Alliance) सभेवर देखील टीका केली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, शिवाजी पार्कात हिंदू बंधू भगिनींनो म्हणायला जीभ कचरली का? असा सवाल शिंदेनी उपस्थित केला आहे. हद्दपार केलेले सगळे काल एकत्र आले होते. कालची सभा म्हणजे फॅमिली गॅदरिंग होती. ठाणे, मुंब्य्रात राहुल गांधींचा फ्लॉप शो,असे म्हणत राहुल गांधी यांच्या रोडशोवर टीका केली आहे. हिंदू धर्माचा अपमान केला, त्यांना जनताच त्यांची जागा दाखवेल, असे म्हणत एकनाथ शिंदे यांनी राहुल गांधींवर टीका केली आहे.

माझ्या तमाम हिंदू बांधवानो हा शब्द कालपासून बंद झाला. काल त्यांनी हिंदू बंधू भगिनींनो म्हणणं टाळलं. हिंदू बंधू भगिनींनो म्हणायला जीभ कचरली का? असे म्हणत ठाकरेंवर जोरदार निशाणा साधला आहे. हिंदू बंधू भगिनींनो म्हणणं टाळलं यावरून आज लक्षात आलं की, बाळासाहेबांचे विचार,त्यांची भूमिका, त्यांची विचारसरणी हे त्यांनी सर्व सोडलं आहे, म्हणूनच आम्हाला त्यांना सोडावं लागलं आणि मोठा निर्णय घेत बाळासाहेबांचे विचार पुढे नेण्याचा विचार करावा लागला. आता त्यांना जनतेनं दोन वर्षांपूर्वी तडीपार केलं आहे, ते काय आम्हाला तडीपार करणार. राहुल गांधींनी हिंदूंचा अपमान केला आहे, जनताच त्यांना त्यांची जागा दाखवून देईल. शिवाजी पार्कमध्ये सभा घेण्याचा त्यांना नैतिक अधिकार नाही. ५०-६० वर्षात जे काँग्रेस सरकारकडून जे झालं नाही, ते पंतप्रधान नरेंद्र मोदींनी १०वर्षात केलं आहे. त्याचा प्रत्यय आपल्या समोर आहे. देशाचा विकास आपल्या समोर आहे. दोन वर्षात महायुतीनं केलेलं काम सर्वांसमोर आहे, त्यामुळे जनता आमच्या पाठीशी उभी राहिलं,असे एकनाथ शिंदे म्हणाले.

उत्तर प्रदेश बिहार, काश्मीरमधून लोकांनी हद्दपार केलेले सर्व लोक काल एकत्र आले होते. त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होतं की, त्यांना जबरदस्तीने आणलं होतं. स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या स्मारकासमोर आणि बाळासाहेबांच्या स्मृतिस्थळासमोर ही सभा झाली हा काळा दिवस आहे. उद्धव ठाकरेंच्या गटाने काल माफी मागितली होती. ज्यांनी सावरकरांचा, सनातन हिंदू धर्माचा अपमान केला, त्यांच्याबरोबर बसल्याची अपमान करणाऱ्यासोबत उद्धव ठाकरे का बसले, उद्धव ठाकरेंनी माफी मागायला हवी, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.

हे ही वाचा:

नारळाची शेंडी फेकून देण्यापेक्षा त्याचा करा ‘असा’ उपयोग

बृहन्मुंबई महापालिका इक्बाल सिंह चहल यांच्यासह आयुक्त, उपायुक्तांना पदावरून हटवले

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा. 

Latest Posts

Don't Miss