Saturday, July 27, 2024

Latest Posts

मनोज जरांगे यांनी लोकसभा निवडणूक लढवावी, आमचा त्यांना पाठिंबा असेल: प्रकाश आंबेडकरांचा सल्ला

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पुन्हा एकदा आंतरवली सराटी मध्ये उपोषणासाठी बसले आहेत.

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पुन्हा एकदा आंतरवली सराटी मध्ये उपोषणासाठी बसले आहेत. आरक्षणाच्या मागणीसाठी काही दिवसांपूर्वी मनोज जरांगे लाखो मराठा बांधवाना घेऊन मुंबईच्या दिशेने आले होते. जरांगे मुंबईच्या वेशीवर आल्यानंतर सरकारकडून त्यांना अध्यादेश देण्यात आला होता. त्यानंतर त्यांनी त्याचे उपोषण मागे घेतले होते. पण सरकारने दिलेल्या अध्यादेशावर अंमलबजावणी न झाल्याने पुन्हा एकदा मनोज जरांगे उपोषणासाठी बसले आहेत. त्यावर वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर म्हणाले, मनोज जरांगे यांनी लोकसभा निवडणूक लढवावी. जर त्यांनी जालन्यातून लोकसभा निवडणूक लढवली तर आमचा त्याला पाठिंबा असेल, असे प्रकाश आंबेडकर म्हणाले. पत्रकार परिषदेमध्ये बोलताना त्यांनी महाविकास आघाडीच्या जागावाटपावरही सविस्तर माहिती दिली आहे.

मनोज जरांगे यांना आम्ही राजकीय मेसेज पाठवला आहे. ही राजकीय लढाई आहे. त्यासाठी तुम्ही जालनामधून अपक्ष निवडणूक लढवा. एखाद्या पक्षाकडून निवडणूक लढवल्यास त्यांच्यावर दबाव टाकला जाऊ शकतो. त्यामुळे त्यांनी अपक्ष निवडणूक लढवावी. त्यासाठी आमचा पाठिंबा असेल, असा प्रस्ताव आम्ही त्यांना पाठवलाय,असे प्रकाश आंबेडकर म्हणाले. ओबीसीच्या ताटातले आरक्षण टिकणारे नाही. ओबीसी आरक्षणाचे ताट वेगळे असले पाहिजे. शिंदे आयोग विशेष अधिवेशन बोलावणार आहे. लोकसभेच्या आधी एक अधिवेशन घ्याव लागेल. हे फसव राजकारण आहे का? कळत नाही. मनोज जरांगे पाटील यांना आम्ही निरोप दिला आहे, की त्यांना हा लढा शरीराचा त्याग करून लढण्याचा अर्थ नाही. उपोषणावेळी जागृती करायची होती ती केली. महिन्यात लोकसभेच्या निवडणूकीत त्यांनी कुठल्याही पक्षाचा आधार न घेता स्वतःहून जालन्यात स्वतंत्र्य लढाई लढली पाहिजे. गरीब मराठ्यांचा प्रश्न उद्या कोणासोबत गेले तर लढता येणार नाही. आम्ही आज सूचना पाठवल्या आहेत. त्यांनी जालना लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी जाहीर करावी. ते निवडून येतील ही आम्हाला खात्री आहे, असे प्रकाश आंबेडकर म्हणाले.

मनोज जरांगे आंतरवली सराटीमध्ये पुन्हा एकदा उपोषणसाठी बसले आहेत. त्यांच्या प्रमुख दोन मागण्या आहेत. सरकार त्यांच्या मागण्या अधिवेशात पूर्ण करणार असे आश्वासन त्यांना दिले होते. आता लवकरच लोकसभा निवडणूक होणार आहे. त्यामुळे आचारसंहिता आता लागू होणार आहे. त्यामुळे लवकरच याबाबतचा निर्णय घ्यावा लागणार आहे. राज्य सरकारला अधिवेशन घ्यावे लागेल, असे प्रकाश आंबेडकर म्हणाले.

हे ही वाचा:

  मिथिला पालकर झळकणार ‘या’ तमिळ चित्रपटात,पोस्ट शेअर करत दिली माहिती

पुण्यात एकाच दिवशी चाकू हल्ल्याच्या दोन घटना, तीन व्यक्ती जखमी

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss