अस्वस्थ झाले असते तर ८४ वर्ष….नारायण राणेंची शरद पवारांवर टीका

देशभरात निवडणुकीची धामधूम सुरु आहे. अश्यात प्रत्येक उमेदवार आपापल्या प्रचारामध्ये गुंतला आहे. अलीकडेच रत्नागिरी मध्ये नारायण राणेंनी शरद पवारांवर टीका केलेली आहे.

अस्वस्थ झाले असते तर ८४ वर्ष….नारायण राणेंची शरद पवारांवर टीका

देशभरात निवडणुकीची धामधूम सुरु आहे. अश्यात प्रत्येक उमेदवार आपापल्या प्रचारामध्ये गुंतला आहे. अलीकडेच रत्नागिरी मध्ये नारायण राणेंनी शरद पवारांवर टीका केलेली आहे. नारायण राणे बोलले, ‘शरद पवार ४ वेळा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री राहिले तसेच १२ वर्ष केंद्रीय मंत्री, २ वर्ष सरंक्षण मंत्री राहुनदेखील काहीही करू शकले नाही. शरद पवार ८४ वर्षांचे आहेत. मी देखील राजकारणी आहे काही लोकांचा अभ्यास मी देखील केला आहे. शरद पवार एखाद्या विषयासाठी जर अस्वस्थ झाले असते तर ८४ वर्ष जगले नसते. ८४ वर्षाच्या वयात शरद पवार कधीच अस्वस्थ झाले नाहीत. आजकाल हवामान बदल जरी झाला तरी माणसाला ५०-५५ च्या वयात हार्ट अटॅक येतो, लोक जातात. ८४ वर्षात जग इकडचं तिकडं होत तरी शरद पवारांना काहीही होत नाही. ते बिनधास्त असतात, वरून मोदींना सांगतात की तुमचं सरकार गेल्याशिवाय आमची अस्वस्थता जाणार नाही. मात्र आमचं सरकार जाणार नाही. ४०० पेक्षा जास्त खासदार येऊन नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान होणार आहेत.’

पुढे नारायण राणे म्हणाले, ‘शरद पवारांना माझे एकच सांगणे आहे, आपल्याला साधू-संत सांगून गेले आहेत. जरी विरोधक असला तरी चांगल्याला चांगला म्हणणे हा माणुसकीचा धर्म आहे. त्यामुळे साहेब चांगल्याला चांगलंच म्हणा. पवार आणि मोदी चांगले मित्र आहेत म्हणता, मग मित्राला चांगलं जर बोलता येत नसेल तर वाईटही बोलू नये, अशी टीका राणेंनी पवारांवर केली. सध्या मोदींनी शरद पवारांवर केलेल्या भटकती आत्मा टीकेमुळे राजकारण चांगलेच तापले आहे. मोदींना उत्तर देत शरद पवार म्हणले होते की, मी स्वतःच्या स्वार्थासाठी नाही तर शेतकऱ्यांचे दुखणे मांडण्यासाठी मी अस्वस्थ आहे असे ते म्हणाले होते. आता नारायण राणेंनी शरद पवार कधीच अस्वस्थ होत नसल्याची टीका केली आहे.

हे ही वाचा:

एवढं असत्य बोलणारा पंतप्रधान कधीच पहिला नाही, Sharad Pawar यांचे PM Modi यांचावर ताशेरे

आम्ही शेण खाल्लं म्हणून तुम्हीपण… Kolhapur मतदारसंघावरून Uddhav Thackeray यांचा Mahayuti वर हल्लाबोल

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा. 

Exit mobile version