Tuesday, May 21, 2024

Latest Posts

एवढं असत्य बोलणारा पंतप्रधान कधीच पहिला नाही, Sharad Pawar यांचे PM Modi यांचावर ताशेरे

एवढा असत्य बोलणार पंतप्रधान मी कधीच पाहिला नाही,' अश्या शब्दांत त्यांनी पंतप्रधान मोदी यांचावर ताशेरे ओढले. 'इंडिया आघाडी प्रत्येक वर्षी एक पंतप्रधान देईल,' या पंतप्रधान मोदी यांनी केलेल्या वक्तव्यावर ते महाविकास आघाडीच्या प्रचारसभेदरम्यान कोल्हापूर येथून बोलत होते.

राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे (NCP Sharad Pawar) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी काल (बुधवार, १ मे) पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्यावर सडकून टीका केली. ‘एवढा असत्य बोलणार पंतप्रधान मी कधीच पाहिला नाही,’ अश्या शब्दांत त्यांनी पंतप्रधान मोदी यांचावर ताशेरे ओढले. ‘इंडिया आघाडी प्रत्येक वर्षी एक पंतप्रधान देईल,’ या पंतप्रधान मोदी यांनी केलेल्या वक्तव्यावर ते महाविकास आघाडीच्या प्रचारसभेदरम्यान कोल्हापूर येथून बोलत होते.

कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातील (Kolhapur Loksabha Constituency) महाविकास आघाडीचे (Mahavikas AghadI) उमेदवार शाहू महाराज छत्रपती (Chhatrapati Shahu Maharaj) यांच्या प्रचारसभेदरम्यान शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह महायुतीवर निशाणा साधला. यावेळी ते म्हणाले, “निवडणुका झाल्यानंतर इंडिया आघाडीला बहुमत मिळाल्यानंतर पूर्ण सरकार देण्याची आमची तयारी आहे. त्यांच्या डोळ्यात जे आहे ते आमच्या डोक्यात नाही. सरकार आल्यावर आम्ही पाच पंतप्रधान देणार यावर आमच्या आघाडीत काही चारचा झालेली नाही. पंतप्रधानपदाबाबत आज चिंता करण्याची गरज आहे. पुरेसे संख्याबळ आल्यास नेत्याची निवड केली जाईल. त्याला पूर्ण सहकार्य देत, स्थिर सरकार देत अखंड पाच वर्ष सरकार चालवलेले जाईल. त्यामुळे पाच वर्ष पाच पंतप्रधान हि कल्पना मोदींच्या डोक्यातून आली, आमच्या डोक्यातून नाही.”

पुढे ते म्हणाले, “लोकांचे समाधान करण्याची खात्री मोदींना नाही. त्यामुळे लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न केला जात आहे. मोदींच्या भाषणाची एक स्टाईल आहे. त्या ठिकाणी स्थानिक नेते जे लिहून देतात ते आणि तेच म्हणतात. कराडमध्ये जाऊन यशवंतराव चव्हाण आणि कराडचा उल्लेख केला नाही. दक्षिणेकडील राज्यांत मोदी यांना प्रतिसाद मिळत नाही त्यामुळे देश तोडायला सुरुवात केली अशी टीका ते करतात. मोदींकडे लोकांचं समाधान करण्याचे मुद्दे नाहीत. त्यामुळे ते भरकटवत आहेत. मोदींचे भाषणातील पहिले तीन चार वाक्य असतात ती कोणीतरी लिहून दिलेली असतात. स्थानिक मुद्द्यांवरून भआशां सुरु करणं हि मोदी स्टाईल आहे. देशाच्या पंतप्रधानांना सर्व राज्य सारखी असतात असं बोलायचं नसतं.”

हे ही वाचा:

आम्ही शेण खाल्लं म्हणून तुम्हीपण… Kolhapur मतदारसंघावरून Uddhav Thackeray यांचा Mahayuti वर हल्लाबोल

Kalyan-Dombivali मध्ये महायुतीचे शक्तीप्रदर्शन, भव्य रॅलीत असणार मुख्यमंत्र्यांची उपस्थिती

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss