Saturday, May 18, 2024

Latest Posts

किरीट सोमय्यांच्या ‘त्या’ व्हिडिओवर नीलम गोऱ्हे यांची प्रतिक्रिया, म्हणाल्या…

पोलीस तपास होईल, त्यावेळी वाहिन्यांनी माहिती गोपनीय स्वरुपात द्यावी, जेणेकरुन पीडित महिलेपर्यंत पोहोचण शक्य होईल.

काल १७ जुलै रोजी एका वृत्तवाहिनीकडून किरीट सोमय्या यांची आक्षेपार्ह्य व्हिडिओ क्लिप दाखवण्यात आली. क्लिप प्रसार झाल्यानंतर सोमय्या यांच्यावर सर्वच माध्यमांमधून आरोप व्हायला सुरुवात झाली. तसेच आज पावसाळी अधिवेशनाच्या दुसऱ्याच दिवशी विधिमंडळात किरीट सोमय्या यांचा मुद्दा चांगलाच गाजला. याच विषयावरुन विरोधकांनी सभागृहात सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला. अशातच किरीट सोमय्यांच्या ‘त्या’ व्हिडिओवर नीलम गोऱ्हे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

आज विधिमंडळात किरीट सोमय्या यांच्या मुद्या वरून सत्ताधारी पक्षविरोधात विरोधी पक्ष आक्रमक झाले. या मुद्या वरून सभागृहात चर्चा सुरु असताना विधान परिषदेच्या उपसभापती निलम गोऱ्हे यांनी त्यांना काय चिंता वाटते, ते सांगितलं आहे. “उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चौकशी जाहीर केली. पण एक अस्वस्थ करणारा मुद्दा आहे, तो म्हणजे दोन-तीन वाहिन्यांवर वारंवार हे शॉट्स दाखवले जात आहेत. मी विनंती करीन, हे सरकारने करावं अस म्हणणार नाही. आलेला व्हिडिओ ब्लर करता येतो., पण काय कृत्य चाललय ते वारंवार दाखवलं जातं. मला असं वाटतं व्हिडिओ दाखवताना थोडफार बंधन ठेवाव” असं निलम गोऱ्हे म्हणाल्या.

तसेच “पोलीस तपास होईल, त्यावेळी वाहिन्यांनी माहिती गोपनीय स्वरुपात द्यावी, जेणेकरुन पीडित महिलेपर्यंत पोहोचण शक्य होईल. तुम्ही पेनड्राइव्ह दिला, तो बघणं म्हणजे खूप कठीण परिक्षा आहे. पण, मी महिला पोलिस अधिकारी, महिला डॉक्टर यांना तो व्हिडिओ बघायला सांगून त्यांचं मत घेईन. हे तपासून त्यातून निघणार काय आहे?” असा सवाल सुद्धा निलम गोऱ्ंहे यांनी उपस्थित केला आहे. त्याच सोबत “त्या महिलेची तक्रार आली पाहिजे. ती भगिनी कोणी ऐकत असेल, तर तिने सभागृहावर विश्वास ठेवावा. लोकांचा विश्वास आपल्यावर आहे. या विश्वासाचा घात होत असेल, तर त्यावर गृहमंत्र्यांनी जाहीर केलेली चौकशी महत्वाची आहे” असं निलम गोऱ्हे म्हणाल्या.

हे ही वाचा:

शरद पवारांची इतक्या वर्षांची साथ का सोडली? दिलीप वळसे-पाटील म्हणाले…

पावसाळी अधिवेशनापूर्वी मंत्रिमंडळ विस्तार करु असा शिंदे-फडणवीस-पवार सरकारचा मानस

हिंदू असो की मुस्लिम यांचे रक्त एकच, एकनाथ शिंदे

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss