Sunday, May 19, 2024

Latest Posts

नितीन सरदेसाई यांचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना सवाल

शिवसेना नेते एकनाथ शिंदे आमदारांच्या एका गटासह नॉट रिचेबल असल्याची माहिती आहे. काही आमदारांची आणि नेत्यांची बैठक झाली.

विधान परिषद निवडणुकीत शिवसेनेची जास्त मते फुटल्याने पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तातडीची बैठक बोलवली असून काहींना बाहेरचा रस्ता दाखविण्याची शक्यता आहे. त्यातच शिवसेना नेते एकनाथ शिंदे आमदारांच्या एका गटासह नॉट रिचेबल असल्याची माहिती आहे. शिवसेना परत एकदा फुटीच्या उंबरठ्यावर आहे. शिवसेना नेते एकनाथ शिंदे आमदारांच्या एका गटासह नॉट रिचेबल असल्याची माहिती आहे. काही आमदारांची आणि नेत्यांची बैठक झाली. या बैठकीला एकनाथ शिंदे नव्हते. एकनाथ शिंदे नॉट रिचेबल आहेत.
मात्र, ते गुजरातमधील सूरतमध्ये असल्याची माहिती आहे. उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्यात मतभेद असल्याची माहिती सोशल मीडियावर पसरत चालली आहे. एकनाथ शिंदे नॉट रीचेबल ही माहिती सध्या प्रचंड पसरत चालली आहे. यावर विरोधी पक्ष नेते नारायण राणे यांनी “शाबास एकनाथ जी योग्य वेळी योग्य निर्णय घेतलास नाहितर लवकरच तुझा आनंद दिघे झाला असता” असं त्यांनी ट्विट केलं त्यानंतर काही वेळाने देवेंद्र फडणवीस यांना ट्विट केलं आहे की “सन्माननीय देवेंद्र फडणवीस जी आपण व आपल्या सहकाऱ्यांनी विधान परिषदेचे 5 आमदार निवडून आणून सरकारचे नाक कापल्या बद्दल खूप खूप अभिनंदन” असं ट्विट शेअर केलं आहे.
“नेहमीच नॉट रीचेबल असणाऱ्या मुख्यमंत्र्यांना त्यांचेच आमदार नॉट रीचेबल. गुरूची विद्या गुरूला” ? असा सवाल नितीन सरदेसाई यांनी ट्विटरवर केला आहे. या ट्रोलिंग नंतर एकनाथ यांनी ट्विटर वर उत्तर दिलं की आम्ही बाळासाहेबांचे कट्टर शिवसैनिक आहोत बाळासाहेबांनी आम्हांला हिंदुत्वाची शिकवण दिली आहे. बाळासाहेबांचे विचार आणि धर्मवीर आनंद दिघे साहेबांची शिकवण यांच्याबाबत आम्ही सत्तेसाठी कधीही प्रतारणा केली नाही आणि करणार नाही असं रोखठोक उत्तर त्यांनी दिल आहे. तर आता मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांचे मत काय असेल हे लवकरच कळेल.

Latest Posts

Don't Miss