Saturday, May 18, 2024

Latest Posts

स्वातंत्र्य दिनानिमित्त सीएम एकनाथ शिंदे म्हणाले, स्वराज्याचं सुराज्यात रुपांतर करण्यासाठी…

राज्यामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या हस्ते मंत्रालयात (Mantralaya) ध्वजारोहण सोहळा पार पडला. यांनतर एकनाथ शिंदे यांनी राज्यातील जनतेला संबोधित केले आहे.

आज दिनांक १५ ऑगस्ट रोजी संपूर्ण भारतभर ७७ वा स्वातंत्र्यदिन (Independence Day 2023) हा साजरा केला जात आहे. दिल्लीत लाल किल्ल्यावर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ध्वजारोहण केले तर राज्यामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या हस्ते मंत्रालयात (Mantralaya) ध्वजारोहण सोहळा पार पडला. यांनतर एकनाथ शिंदे यांनी राज्यातील जनतेला संबोधित केले आहे.

यावेळी बोलत असताना एकनाथ शिंदे म्हणाले आहेत की, यानंतर राज्याला उद्देशून केलेल्या भाषणात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वराज्याचं सुराज्यात रुपांतर करण्यासाठी प्रयत्न करण्याची आवश्यकता असल्याचं म्हटलं. सोबतच यावेळी त्यानी सरकारने जनतेसाठी केलेल्या योजनांची उजळणी केली. शेतकऱ्यांसाठी एक रुपयात पीक विमा योजना, एसटीने तिकीटात महिलांना सूट, राज्यातील नागरिकांना मोफत उपचार आणि तपासणीचा निर्णय यासह अनेक योजनांची माहिती त्यांनी दिली.

तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुढे म्हणाले आहेत की, राज्यातील जनतेला शुभेच्छा देताना आनंद होत आहे. गरजूंच्या दुःखावर फुंकर घातली पाहिजे. पंतप्रधान यांनी मेरी माटी मेरा देश कार्यक्रम घेऊन आपल्याला जबाबदारीच आठवण करुन दिली. स्वराज्याचं सुराज्यात रुपांतर करण्यासाठी प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे. केंद्र सरकारप्रमाणे राज्यातही विकासाची गंगा वाहावी यासाठी काम करता आलं. केंद्र आणि राज्याचा समन्वय ठेवण्याचे काम आम्ही करत आहोत. देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांचीही साथ मोठ्या प्रमाणावर मिळते.”

संपूर्ण देश स्वातंत्र्यदिनाच्या रंगात रंगला आहे. गल्लीपासून दिल्लीपर्यंत सगळीकडेच स्वातंत्र्यदिनाचा उत्साह पाहायला मिळत आहे. महाराष्ट्रातही स्वातंत्र्यदिन जल्लोषात साजरा केला आहे. सरकारी इमारती, मंदिरं, धरणं यासह विविध वास्तूंवर तिरंग्याची आकर्षक रोषणाई करुन स्वातंत्र्यादिन साजरा केला जात आहे. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबईत आधी वर्षा या शासकीय निवासस्थानी मग मंत्रालयात ध्वजारोहण केलं.

हे ही वाचा:

औरंगाबादमधील एक धक्कादायक बातमी!, पोलिस पथकाला गाडीखाली चिरडण्याचा प्रयत्न…

IND vs WI T20, आज अंतिम लढाई आणि निर्णायक सामना, पहा दोन्ही संघाची प्लेईंग ११

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss