Saturday, April 20, 2024

Latest Posts

पुन्हा एकदा संजय राऊतांचा मोदी सरकारवर निशाणा

नव्या संसद भवनाच्या उद्घाटनाच्या सोहळ्यावरून सुरु झालेला हा वाद काही संपण्याचे नाव काही घेत नाही. संजय राऊत (Sanjay Raut) हे सत्ताधारांवर नेहमीच टीका करत असतात.

नव्या संसद भवनाच्या उद्घाटनाच्या सोहळ्यावरून सुरु झालेला हा वाद काही संपण्याचे नाव काही घेत नाही. संजय राऊत (Sanjay Raut) हे सत्ताधारांवर नेहमीच टीका करत असतात. आज पुन्हा एकदा ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी मोदी सरकारवर टीका केली आहे. माध्यमांशी बोलताना संजय राऊत म्हणाले की, भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू (Draupadi Murmu) यांना या सोहळ्यापासून दूर ठेवले जात आहे. हे नरेंद्र मोदींनी समोर येऊन सांगावे अशी मागणी राऊतांनी केली आहे. यांनतर संजय राऊतांनी एक प्रश्न उपस्थित केला आहे ते म्हणाले की, ऑस्ट्रेलियामध्ये लोकशाही आहे, पापुआ न्यू गिनीच्या पंतप्रधानांनी पाय धरले याचे कसले गोडवे गात आहात?

पुढे संजय राऊत म्हणाले की, देशामधील निर्णय आम्हीच घेणार? आम्हीच ठरवणार, राष्ट्रपती कोण? सरन्यायाधीश कोण? आम्हीच सार्वभौम असे मानसिकतेतून घडत आहे. एक लक्षात घेतले पाहिजे की भारतीय जनता पार्टी आमच्यावर टीका करत आहे. परंतु आम्ही फक्त विरोधासाठी विरोध करत नाही. हा संविधानाच्या सन्मानाचा प्रश्न आहे. मोदींच्या हस्ते हा संसद भवनाचे उद्घाटन होणार आहे आणि बनवलेल्या निमंत्रण पत्रिकेवर राष्ट्रपतींचे नाव देखील नाही त्याचबरोबर पराष्ट्रपतींचंही नाव नाही. याबाबतीत कोणी बोलत नाही असे संजय राऊत यांनी मोदींवर टीका केली आहे.

पुढे संजय राऊत म्हणाले की, नवे संसद भवन हे कोणाची प्रायव्हेट प्रॉपर्टी नाही. परंतु आम्ही या कार्यक्रमावर बहिष्कार घातला आहे. आता सत्ताधारी उदाहरणे इंदिरा गांधी आणि राजीव गांधींची देत आहेत. आम्हाला निमंत्रण मिळाले आहे. मोठ्या लोकांचा लग्न समारंभ असतो तसे सगळ्या गावाला निमंत्रण देण्यात आले आहे. आमचा मुद्दा हा आहे की राष्ट्रपतींना निमंत्रण का नाही? आडवाणी का गायब आहेत? हे सवाल संजय राऊतांनी उपस्थित केले आहेत.

पुढे ते म्हणाले की, आमचा नवीन संसद भवनाच्या उद्घाटन सोहळ्याला विरोध नाही. परंतु राष्ट्रपतींना दूर का केले जात आहे. कोण शिंदे-मिंधे गट ? मी पक्ष म्हणून त्यांच्याकडे बघत नाही. तो गट म्हणजे भाजपाने पाळलेला कोंबड्यांचा खुराडा आहे. गावाला कोंबड्यांसाठी बनवलेले खुराडे असतात ना तसे आहेत ते. कधीही कोंबड्या कापल्या जातील. बोलायला सकाळ, संध्याकाळ कोंबड्या-कोंबडे आरवत असतात तसं ते करत आहेत. असे संजय राऊत म्हणाले.

हे ही वाचा:

Arvind Kejriwal आले विरोधकांना जोडण्यासाठी, आज घेणार शरद पवारांची भेट

पुण्यात टिंबर मार्केटमध्ये अग्नितांडव, अग्निशमन दलाच्या ३० गाड्या घटनास्थळी

अवघ्या काही तासांत लागणार HSC चा निकाल, विद्यार्थ्यांची उत्सुकता शिगेला

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss