Wednesday, February 28, 2024

Latest Posts

पंकजा मुंडेंचा कार्यकर्त्यांना सल्ला

गोपीनाथ गडावर लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्या जयंतीनिमित्त आज रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं.

दारु प्यायची असेल तर हातभट्टीची पिऊ नका, तंबाखू- पुड्या खाणं बंद करायांनी कार्यकर्त्यांना दिलाय. लोकनेते गोपीनाथ मुंडे यांची जयंतीनिमित्त पंकजा मुंडे यांनी बीड, परळीमध्ये (Beed) विविध उपक्रमाचे आयोजन केले होते.

गोपीनाथ गडावर लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्या जयंतीनिमित्त आज रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं. त्यावेळी पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांनी देखील रक्तदान केलं. रक्तदान करताना यावेळी त्यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधला. हातभट्टीची दारु पिऊ नका, तंबाखू, पुड्या खाऊन कुठेही थूकू नका, असाही सल्ला यावेळी पंकजा मुंडेंनी कार्यकर्त्यांना दिला. त्यांनी दिलेल्या या सल्ल्याने पंकजा मुंडे पुन्हा एकदा चर्चेत आल्यात.

पंकजा मुंडे काय म्हणाल्या ?

दारू प्यायची असेल तर हातभट्टीची पिऊ नका.त्याने विष बाधा होते.पिण्याला मी नाही म्हणत नाही. तंबाखू आणि पुड्या खाणे बंद करा आणि खाऊन कुठेही थुंकू नका. त्याने कॅन्सर होतो. तंबाखू-पुड्या खाऊन तुम्ही मंदिराजवळ थुंकता, कसं दिसते ते. यापुढे तंबाखू-पुड्या खाऊ नका. तसेच चांगलं चांगलं खा. मास मच्छी व्हेजिटेरियन खा आणि आरोगी रहा असा सल्ला देखील पंकजा मुंडे यांनी कार्यकर्त्यांना दिला. गोपीनाथ गडावर लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे यांच्या जयंतीनिमित्त रक्तदान करताना पंकजा मुंडे बोलत होत्या.

पंकजा मुंडेंचं कार्यकर्त्यांना आवाहन –

गोपीनाथ मुंडे यांच्या जयंतीनिमित्त १२ डिसेंबर रोजी दरवर्षी कार्यकर्ते मोठ्या संख्येने गोपीनाथ गडावर जमतात. या सर्वांनी यावेळी आपआपल्या गावात आपल्या आवडीप्रमाणे जयंती साजरी करावी. तसेच गोपीनाथ मुंडे यांचे विचार महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहचवावे, असं आवाहन देखील पंकजा मुंडे यांनी कार्यकर्त्यांना आज केले.

मुंडे साहेबांचे स्वप्न जनतेसाठी होते, त्यामुळेच त्यांनी मला तुमच्या ओटीत टाकले आहे. मुंडे साहेब १०० वर्षे जगावेत असे तुम्हाला आम्हाला वाटतं होते. मात्र, साहेब जगू शकले नाहीत. मी प्रभु वैद्यनाथाला अभिषेक घातला, बुध्द विहारात जावून बौध्द वंदना केली. त्यानंतर हजरत मलिकशाह दर्गा येथे चादर चढवली आणि मुंडे साहेबांसाठी प्रार्थना केली. मुंडे साहेब आज आपल्या नसले तरी त्यांचे विचार आणि संस्कार आजही आपल्यात आहेत. मुंडे साहेबांचे विचार शतायुषी व्हावेत हाच संकल्प आहे, असे पंकजा मुंडे म्हणाल्यान आहेत .

Latest Posts

Don't Miss