Saturday, July 27, 2024

Latest Posts

लोकसभा-विधानसभा निवडणुकीत फोन नंबर टॅपिंगचा फायदा होणार; आमदार रोहित पवारांचा टोला

पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला (Director General of Police Rashmi Shukla) यांना पुन्हा एकदा मुदतवाढ करून देण्यात आली आहे.

पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला (Director General of Police Rashmi Shukla) यांना पुन्हा एकदा मुदतवाढ करून देण्यात आली आहे. राजकीय नेत्यांचे फोन टॅपिंग केल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला आहे. रश्मी शुक्ला या पुढील दोन महिन्यांनंतर सेवा निवृत्त होणार आहेत. मात्र असे असून देखील त्यांचा कार्यकाळ दोन वर्ष वाढवून मिळण्याची शक्यता आहे. याला मताला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे देखील सकारात्मक आहेत. लवकरच त्यांच्या फाईलवर सही होण्याची शक्यता आहे. रश्मी शुक्ला यांचा कार्यकाळ चार महिने शिल्लक आहे, त्याआधीच हा निर्णय घेण्याची शक्यता आहे.या निर्णयावर अनेक विरोधी पक्ष नेत्यांनी टीका केली आहे. त्यावर शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी जोरदार टीका केली आहे.

आमदार रोहित पवार म्हणाले, आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीपूर्वी रश्मी शुक्ला यांना ‘फोन टॅप’ (Phone Tap) करण्यासाठी मुदत वाढ करून दिली आहे, असे म्हणत आमदार रोहित पवारांनी (Rohit Pawar) टोला लगावला आहे. भाजप कधीही कोणता कायदा पाळत नाही. लोकसभेमध्ये फायदा होण्यासाठी रश्मी शुक्ला यांना मुदतवाढ करून दिली आहे. आगामी लोकसभा विधानसभा निवडणुकीमध्ये यांना फायदा होण्यासाठी हे सर्व केले जात आहे. काही दिवसांआधी रश्मी शुक्ला यांच्यावर फोन टॅपिंगमुळे कारवाई करण्यात आली होती. माझ्या अंदाजाने काही फोन टॅपिंगला दिले, त्यामध्ये माझा सुद्धा नंबर असावा. मात्र, आम्ही लोकांच्या हिताची कामे या व्यतिरिक्त काही बोलत नाही, असे रोहित पवार म्हणाले.

आगामी लोकसभा निवडणुकीत बारामती लोकसभा मतदारसंघातून अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार राजकारणाच्या रींगणात उतरल्या आहेत. आता पवार विरुद्ध पवार आमने सामने येणार आहेत. त्यावर बोलताना रोहित पवार म्हणाले, पवार विरुद्ध पवार हे भाजपाला हवं आहे. मात्र चाणक्य लोकं मतांमधून निर्णय घेतात. दादांच्या भूमिकेवर मी काय बोलणार चोरलेला पक्ष कुठल्या उमेदवाराला द्यायचा तो त्यांचा प्रश्न आहे. पण जर भाजपच्या सांगण्यावरून दादा निर्णय घेत असतील तर कठीण, असे रोहित पवार म्हणाले.

हे ही वाचा:

फक्त आजच नाही तर ३६५ दिवस ‘मराठी भाषा गौरव दिन’ साजरा व्हायला हवा – Raj Thackeray

मुंबईत आज पाणीपुरवठा बंद; काही भागात १०० टक्के तर ३० टक्के पाणीपुरवठा बंद

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss