Saturday, March 2, 2024

Latest Posts

POLITICS: ‘मला नाही वाटत आदित्य असं काही करेल’, काय म्हणाल्या SHARMILA THACKERAY?

राज ठाकरे यांच्या पत्नी आणि आदित्य ठाकरे यांच्या काकी शर्मिला ठाकरे यांनी विचारला केली असता त्यांनी पुतण्याची बाजू घेतली आहे.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या स्वयंरोजगार विभागाकडून महिलांसाठी एका कार्यक्रमाचे आयोजन मुंबईतील मराठी पत्रकार संघात करण्यात आले आहे. ‘उद्योग कर उद्योग’ या संकल्पनेंतर्गत महिलांसाठी स्वयंरोजगाराच्या अनेक संधी एकाच मंचावरती उपलब्ध करून देऊन महिलांना उद्योग क्षेत्रा संदर्भात मार्गदर्शन करण्यात आले. या कार्यक्रमात विशेष अतिथी म्हणून शर्मिला ठाकरे (SHARMILA THACKERAY) यांनी हजेरी लावली होती. यावेळी माध्यमांनी आदित्य ठाकरेंसंदर्भात प्रश्न विचारला असता, शर्मिला ठाकरे व्यक्त झाल्या.

चौकशा तर कोणीही लावेल

सध्या शासनाकडून दिशा सालियन (Disha Salian) मृत्यूप्रकरणात विशेष तपास यंत्रणा म्हणजेच SIT मार्फत चौकशी करण्याची घोषणा करण्यात आली आहे. याप्रकरणात भाजप आमदार नितेश राणे (Nitesh Rane) आणि सर्व सत्ताधाऱ्यांकडून ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांच्यावर आरोप केले आहेत. दिशा सालियन प्रकरणात आदित्य ठाकरे जेलमध्ये जाणार असा दावा सातत्याने नितेश राणे करत आहेत. हे सर्व असताना, राज ठाकरे यांच्या पत्नी आणि आदित्य ठाकरे यांच्या काकी शर्मिला ठाकरे यांनी विचारला केली असता त्यांनी पुतण्याची बाजू घेतली आहे. ‘मला नाही वाटत आदित्य असं काही करेल. चौकशा तर कोणीही लावेल, आम्ही पण यातून गेलोय, असं म्हणत शर्मिला ठाकरे यांनी आदित्य ठाकरे यांची बाजू सावरली आहे.

काय म्हणाल्या शर्मिला ठाकरे?

देशात ६० टक्के तरुण आहेत. आपल्याकडे नोकऱ्या उपलब्ध नाही. केंद्र आणि राज्याच्या अनेक योजना आहेत, तरीही या योजनांचा लाभ नागरिकांना घेता येत नाही, कारण हव्या तशा या योजना नागरिकांपर्यंत पोहचत नाहीत. नोकऱ्या नसतात, त्यात उद्योग कसा करायचा यासंदर्भात हा कार्यक्रम आहे. अनेक जण आपल्या पाल्यांना कर्ज काढून शिक्षण देतात, मात्र नोकऱ्याच नसल्याने अडचण येते.

SIT बाबत विचारलेल्या प्रश्नावर शर्मिला ठाकरे यांनी उत्तरातून आदित्य ठाकरे यांची पाठराखण केल्यामुळे हा सध्या चर्चेचा विषय बनला आहे.

हे ही वाचा:

POLITICS: तुम्ही पहिल्या दिवशीच बुट्टी मारली!, BJP ची AADITYA THACKERAY यांच्यावर टीका

Dry Skin Tips, हिवाळ्यात त्वचा कोरडी होते? चमकदार त्वचेसाठी अवलंब करा ‘या’ घरगुती उपायांचा

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss