Sunday, May 19, 2024

Latest Posts

POLITICS: शिंदे समिती बरखास्त करा- मंत्री छगन भुजबळ

शिंदे समितीचे काम आता संपलं आहे, त्यामुळे शिंदे समिती बरखास्त करण्यात यावी, असे मत मंत्री छगन भुजबळ यांनी मांडले.

पुण्यात छगन भुजबळ (CHHAGAN BHUJBAL) यांची पत्रकार परिषद घेण्यात आली. सरसकट कुणबी (KUNABI CERTIFICATES) प्रमाणपत्र द्या, अशी मान्यता आम्ही कधीच देणार नाही. मराठा समाज (MARATHA COMMUNITY) ओबीसीमध्ये बसत नाही. संविधानाच्या (CONSTITUTION) तरतुदीनुसार मराठा समाजाला आरक्षण आहे, आणि मराठा समाजाला असलेल्या आरक्षणाला माझा विरोध नाही. असे छगन भुजबळ यांनी यावेळी माध्यमांशी बोलतांना सांगितले. शिंदे समितीचे (SHINDE COMMITTEE) काम आता संपलं आहे, त्यामुळे शिंदे समिती बरखास्त करण्यात यावी, असे मत मंत्री छगन भुजबळ यांनी मांडले.

प्रकाश आंबेडकरांना (PRAKASH AMBEDKAR) माझी विनंती आहे की, त्यांनी आम्हाला मार्गदर्शन करा, आम्हाला सल्ला द्या. मनोज जरांगे पाटील (MANOJ JARANGE PATIL) मला विदूषक बोलत आहे पण त्यांनी माध्यमांशी बोलतांना काय सांगितले? ‘पोलिसांनीच पोलिसांवर हल्ला केला’, असं बोलणारा विदूषक की मी? असा सवाल छगन भुजबळांनी माध्यमांना केला.

संपूर्ण मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देणं. हे कायद्याला धरून नाही. मी काम सुरू झालं. तेव्हा ५ हजार कुणबी नोंदी मिळाल्या. मग एकदम साडे अकरा हजार कुणबी नोंदी सापडल्या. हे सगळं वाढतच चाललं आहे. अख्ख्या महाराष्ट्रात जाऊन जिल्ह्यात जाऊन कुणबी नोंदी शोधा. असं या समितीला सांगितलं नव्हतं. मात्र आता या नोंदी अधिक प्रमाणात सापडत आहेत. त्यांचा जर ओबीसींमध्ये समावेश केला. तर ओबीसी समाजावर तो अन्याय असेल, असं छगन भुजबळ म्हणाले. मी कुठल्याही पक्षाचा विरोधक नाही, मी ओबीसी (OBC)-मागासवर्गीय समाजाची बाजू मांडतोय असे मंत्री छगन भुजबळ (CHHAGAN BHUJBAL) यावेळी म्हणाले. जे खरोखर कुणबी आहेत त्यांनी आधीच सर्टीफीकीट मिळविली आहेत, त्यांचा काही प्रश्न नाही. परंतु, आता कागदपत्रांवर लिहून सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्यास आपला विरोध असल्याचे मंत्री छगन भुजबळ यांनी म्हटले आहे. मराठ्यांना माझा विरोध नाही. त्यांना स्वतंत्र आरक्षण देण्यात यावं. त्यांना ओबीसीतून आरक्षण देऊ नये अशीच आपली कायम मागणी आहे असे मंत्री छगन भुजबळ (MINISTER CHHAGAN BHUJBAL) यांनी म्हटले आहे. दरम्यान, आज सकाळी स्वराज्य संघटनेच्या कार्यकर्त्यांनी छगन भुजबळांना विरोध केला होता

हे ही वाचा:

मुंबईमधील अवकाळी पावसामुळे हवेची गुणवत्ता सुधारली

उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांचा विजयगड बंगल्यात मुक्काम

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss