Saturday, July 27, 2024

Latest Posts

POLITICS: मातोश्रीवर चकरा मारु नका, नाहीतर तेथील सरडेही आत्महत्या करतील – CHITRA WAGH

पूजा चव्हाणचा बलात्कार करून हत्या केल्याचे आरोप संजय राठोड यांच्यावर भाजपने केले. त्याच संजय राठोडांना मंत्रिमंडळाच्या पंगतीला बसवून घेतले आणि तेच फडणवीस आज नवाब मलिक यांचे मंत्रिपद का काढून घेतले नव्हते असा प्रश्न विचारतात? देवेंद्रभाऊ सरडासुध्दा आत्महत्या करेल हो!! असे ट्वीट करत सुषमा अंधारे (SUSHMA ANDHARE) यांनी हल्लबोल केला. 

सुषमा अंधारे (SUSHMA ANDHARE) आणि चित्रा वाघ (CHITRA WAGH) यांच्यात नेहमीच शाब्दिक चकमक पाहायला मिळत असते. ट्वीटरच्या माध्यमातून चित्रा वाघ (CHITRA WAGH) या सुषमा अंधारे (SUSHMA ANDHARE) यांनी केलेल्या कृतीवर भाष्य करत असतात. सोशल माध्यमांमध्ये सक्रीय सहभाग असलेल्या चित्रा वाघ यांनी पुन्हा एकदा सुषमा अंधारे यांनी केलेल्या ट्वीटवरून सुनावलं आहे.

काय आहे चित्रा वाघ यांचे ट्वीट? 

सुषमाताई…

तुमच्या बाबतीत तर कित्येक सरडे दररोज आत्महत्या करतात हिंदू देवी-देवतांबद्दल घाणेरडी विधाने करणे वंदनीय हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांची टिंगल उडविणे उद्धव जी आणि आदित्य ठाकरे बद्दल तुम्ही केलेली विधाने विसरलात की काय..?

आणि आज तुम्ही त्यांचेच गोडवे गाताय… मान्य आहे…मातोश्रीभोवती असे सरडे नियमित फिरत असतात.. फार मातोश्रीवर चकरा मारु नका, नाहीतर तेथील सरडेही आत्महत्या करतील.

असे ट्वीट करत चित्रा वाघ यांनी सुषमा अंधारे यांच्यावर टीका केली आहे. मागच्या वेळेस चित्रा वाघ यांनी सरड्याच्या विषयाला घेऊन सुप्रिया सुळे यांच्यावर देखील टीका केली होती.

काय होतं ‘ते’ ट्वीट? 

सुप्रिया ताई, तुमची रंग बदलण्याची कला पाहून सरड्याला पण लाज वाटली असेल… किती सोयीस्करपणे तुमच्या संवेदना जाग्या होताहेत हो..

तुमच्या हाकेच्या अंतरावर असलेल्या मंचरच्या मुलीसाठी तुमच्या संवेदना जाग्या झाल्या नाहीत.. मुलीला मुस्लिम तरूणानं पळवून नेलं. ती अडीच वर्ष सापडली नाही. तेंव्हा तुमचंच लाडकं सरकार होतं.. श्रद्धा वालकर प्रकरणात तुम्ही वेळीच लक्ष दिलं असतं तर तिचेही ३५ तुकडे झाले नसते. वसुलीत मग्न असलेल्या तुमच्या गृहमंत्र्यांना श्रद्धा वालकरच्या आई वडिलांची हाक ऐकू आली नाही, हे ही दुर्दैवच ! मीरा रोड प्रकरणात नक्कीच कारवाई होईल. दोषींची गय केली जाणार नाही कारण इथे गृहमंत्रालय देवेंद्र फडणवीस जी या सक्षम नेत्याकडे आहे. त्यासाठी तुम्हाला ‘मगरमच्छ के आंसू’ गाळण्याची गरज नाही, मोठठ्या ताई…

हे ही वाचा:

आंध्र प्रदेशात धडकले मिचॉन्ग चक्रीवादळ, वादळी वाऱ्यासह पावसाची हजेरी भारतातील मुलींच्या पहिल्या शाळेचं स्मारक उभं राहण्याचा मार्ग मोकळा

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss