Monday, May 20, 2024

Latest Posts

Politics: बेरोजगाराच्या मुद्यांचा राजकीय खून झालाय का?, JITENDRA AWHAD यांचा सवाल

तुमचं प्लॅनिंग कधीपासून होतं, हे स्वतः विचार करा. ५ वर्ष पवार साहेबांचं डोकं कोणी खाल्लं? असा सवाल आव्हाड यांनी अजित पवार यांना विचारला आहे.

आमदार जितेंद्र आव्हाड बेरोजगारीच्या मुद्द्यावरून सोशल मिडीयाच्या माध्यमातून व्यक्त झाले आहेत. याआधी जितेंद्र आव्हाड अजित पवार यांनी केलेल्या भाष्यावर व्यक्त झाले होते. त्यांनतर त्यांनी व्हीडीओ शेयर करत अजित पवार यांच्यावर टीका केली होती. आता पुन्हा त्यांनी बेरोजगारीचा प्रश्न विचारत ट्वीट केले आहे.

काय आहे आमदार जितेंद्र आव्हाड यांचे ट्वीट

बेरोजगाराच्या मुद्यांचा राजकीय खून झालाय का? रा्ज्याच्या रोजगार आणि उद्योजकता विभागाकडील नोंदीनुसार राज्यात ६२ लाखांहून अधिक अधिकृत बेरोजगार आहेत. विशेष म्हणजे बेरोजगारीचे हे प्रमाण शासन दरबारी नोंद केलेल्यांचं आहे. याचा अर्थ नोंदणी नसलेल्या बेरोजगारांची संख्या दुप्पट असण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्र्यांच्या ठाणे जिल्ह्यात तब्बल ४ लाख बेरोजगारांची नोंद आहे. अलिकडेच एका पात्र शिक्षिक उमेदवार तरूणीने शिक्षणमंत्र्यांना शिक्षक भरतीविषयी सार्वजनिकपणे प्रश्न विचारल्यानंतर राज्याचे शिक्षण मंत्री प्रसारमाध्यमांच्या कॅमे-यासमोर म्हणाले की, “तुझं नाव शोधून काढून तुला अपात्र ठरवू.” म्हणजे बेरोजगार तरूण-तरूणींना जाहीरपणे धमकी देण्यापर्यंत यांची मजल गेली आहे. ही महाराष्ट्राची संस्कृती कधीच नव्हती. अवकाळी पावसाने ग्रामीण भागातील शेतकरी देशोधडीला लागलाय. मुंबई, पुण्यासारख्या ठिकाणी शिकणा-या त्यांच्या मुलांकडे खानावळीचं बिल भरण्यासाठीचे पैसे नाहीत. पण सरकार सुशेगात आहे. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री राजकीय टीका तावातावाने करतात. पण बेरोजगारीच्या मुद्यावर बोलायला त्यांच्याकडे वेळ नाही. दुष्काळ, बेरोजगारी, महागाई या समस्या फक्त वर्तमानपत्रांच्या हेडलाईन होतायत. सरकारने याकडे गांभीर्याने पाहिलं नाही तर बेरोजगार तरूणांनी उद्या कायदा हातात घेतला तर त्याचे फार वाईट परिणाम संपूर्ण महाराष्ट्राला भोगावे लागतील.

बापाची चप्पल पायात आली म्हणून बाप होता येत नाही

शरद पवार (SHARAD PAWAR) यांचा राजकीय प्रवास धुळीत मिळवून सत्तेत यायचं हे आपणास हवं होतं. मी कोणाशी चर्चा केली नाही, बैठका घेतल्या नाहीत, ना कोणाला भेटलो. आंदोलन करायला मला कोणाचीही परवानगी लागत नसल्याचे आव्हाड म्हणाले. बापाची चप्पल पायात आली म्हणून बाप होता येत नाही किंवा अक्कल वाढत नाही. तुम्ही शरद पवार यांना घाबरवायला जाता, बस करा हे बालिश राजकारण. काकाच्या पाठीत सुरा कोणी भोसकला? स्वतः च्या ताईला त्रास कोणी दिला?असे म्हणत आव्हाड यांनी धनंजय मुंडे यांच्यावरही टीका केली. तुम्ही कोणीही झालात तरी तुमचा निर्माता शरद पवारच आहे, हे अख्या जगाला माहिती आहे. शरद पवार (SHARAD PAWAR) यांचा राजीनामा तुम्हाला का हवा होता? ते जर बारामती (BARAMATI) तून निवडणूक लढवत असतील तर यात गाजावाजा करण्याची गरज काय? भाजप (BJP) सोबत चला हे कोण कोण सांगायचं? तुमचं प्लॅनिंग कधीपासून होतं, हे स्वतः विचार करा. ५ वर्ष पवार साहेबांचं डोकं कोणी खाल्लं? असा सवाल आव्हाड यांनी अजित पवार यांना विचारला आहे.

हे ही वाचा:

आज सकाळी Ladakh मध्ये जाणवले भूकंपाचे धक्के…

रणबीरच्या ‘ॲनिमल’ची पहिल्याच दिवशी ‘इतक्या’ कोटींची बंपर कमाई

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss