सध्या राज्याच्या राजकारणात अनेक घडामोडी या घडत आहेत. राज्यातील अनेक प्रकल्प गुजरातमध्ये जात असल्याचे आरोप सध्या जोरदार होत आहेत. आणि अश्याच राज्यातील आणखी एक प्रकल्प गुजरात मध्ये जात असल्याचं चित्र सध्या डोळ्यासमोर आहे. महानंद दुधावरून राज्यातील राजकारण तापलं असल्याचं चित्र दिसून येत आहे.
महानंद डेअरी प्रकल्प आता गुजरातला जाणार असल्याच्या मुद्यावरून वातावरण हे चांगलं तापलं आहे. अश्यातच विरोधकांनी सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. महानंदचे चेअरमन राजेश पराजणे यांच्यासह संचालक मंडळाने राजीनामा दिला आहे. त्यामुळे महानंद आता एनडीडीबीकडे हस्तांतरित करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. मात्र महानंद एनडीबीकडे जाणार असल्याने विरोधक संतापले आहेत.महानंद डेअरीचा आता संपूर्ण कारभार गुजरातमधून चालवला जाणार आहे. याच मुद्यावरून विरोधक संतापले असून सरकारला एक डेअरी चालवता येत नाही का, असा संतप्त सवाल विचारला जात आहे.
या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे नेते, जितेंद्र आव्हाड यांनीही एक ट्विट करत सरकारवर ताशेरे ओढले आहेत. या ट्विट मध्ये जितेंद्र आव्हाड म्हणाले आहेत की, मुद्दामहून रात्री ट्वीट करीत आहे. उद्या सकाळीच महानंद डेअरीत जा, डेअरीतून दूध विकत घ्या.. देवाला दुधाचा अभिषेक करा, गोड शिरा करा, जेवढं शक्य असेल तेव्हढं गोडधोडही करा… आता हे काय नवीन सांगतो आहे, असं म्हणाल ! हे सांगण्याचं कारण म्हणजे, महानंद आता गुजरातला विकलेय ! जय हो, महानंद की ! #Maharashtra
तर संजय राऊत यांनी देखील या मुद्द्यावरून सर्कावर जोरदार निशाणा साधला आहे. राज्यातील महानंद दुग्धसंस्थेचा कारभार आता गुजरातमधून चालवला जाणार आहे. महानंदाचे चेअरमन हे राधाकृष्ण विखे पाटील यांचे सख्खे मेव्हणे होते. हे राज्य सरकार एक डेअरी चालवू शकत नाहीत. पण शुगर लॉबीच्या सर्व लोकांच्या डेअरी व्यवस्थित सुरु आहेत. महानंदा डेअरीची गोरेगाव येथील मोक्याच्या जागेवरील ५० कोटीची जमीन विकण्याचा घाट राज्य सरकारने घातला आहे. ही जमीन अदानींना देण्याचा डाव आहे. देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि अजित पवार हे मुंबईचा सौदा करायला निघाले आहेत. महाराष्ट्रातील असूनही हे लोक राज्यातील संस्था गुजरातमध्ये जाण्याला विरोध करत नाहीत, असा हल्लाबोल संजय राऊत यांनी केला.
हे ही वाचा:
भोपळ्याच्या बिया पुरुषांसाठी ठरतात गुणकारी,जाणुन घ्या फायदे
‘त्यांचं’ निधन ही सांस्कृतिक क्षेत्राची कधीही भरुन न निघणारी हानी- Ajit Pawar
Follow Us