Thursday, February 29, 2024

Latest Posts

POLITICS: कृषीमालाला चांगला भाव मिळेल, याचा निर्णय होणे गरजेचे- आमदार अनिल देशमुख

कापसाला १४ हजार रुपये, सोयाबीनला ८ हजार रुपये भाव दिला पाहिजे आणि त्याचबरोबर धानाचा बोनस देखील लवकरात लवकर जाहीर केला पाहिजे. असे आमदार अनिल देशमुख यांनी अधिवेशनात सांगितले. 

महाराष्ट्रातील शेतकरी अतिशय अडचणीत आहे आणि अशा परिस्थितीत विधानसभेमध्ये त्याची चर्चा झाली पाहिजे अशी  सर्वांची मागणी असल्याचे आमदार अनिल देशमुख यांनी सांगितले. सध्या नागपूर येथे हिवाळी अधिवेशन सुरु असून राज्यभरात अधिवेशनाबाबत चर्चा सुरु आहे.

आम्ही सरकारला, अध्यक्षांना विनंती केली की, शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर तुम्ही आज चर्चा घडवून आणा, आजच ही चर्चा झाली पाहिजे, पण सरकार या शेतकऱ्यांच्या प्रश्नात बोलायला तयार नाही आणि विधानसभेच्या अध्यक्षांनी सुद्धा आम्हाला परवानगी दिली नाही. आज विदर्भामध्ये अधिवेशन होतंय, विदर्भामध्ये प्रामुख्याने मोठ्या प्रमाणात कापसाचे पीक घेतले जाते. कापूस उत्पादक शेतकऱ्यांना २ वर्षांपूर्वी आमच्या सरकारमध्ये १४ हजार रुपयांपर्यंत कापसाला भाव दिला होता. मागच्या वर्षी या सरकारने कापसाला भाव दिला तर नाहीच आणि यावर्षी तर खराब परिस्थिती कापसाच्या बाबतीत झाली आहे, यावर्षी कापसाला फक्त ७ हजार रुपये भाव आहे. त्यामुळे आमच्या सर्व पक्षांची मागणी आहे की, कापसाला १४ हजार रुपये भाव राज्य शासनाने दिला पाहिजे, असे मत आमदार अनिल देशमुख मांडले.

सोयाबीन पीक संपूर्ण महाराष्ट्रामध्ये होते, परंतु सोयाबीन पीकाला देखील भाव नाही, सोयाबीनचे हमीभाव राज्य आणि केंद्र शासनाने जाहीर केले, ते फक्त ४ हजार २०० रुपये, १० वर्षांपूर्वी, आज जे देवेंद्रजी फडणवीस उपमुख्यमंत्री आहेत ते विरोधी पक्षनेते असताना ते आणि पाशा पटेल या दोघांनी शेतकरी दिंडी काढली होती. त्या दिंडीमध्ये त्यांनी मागणी केली होती की, सोयाबीनला ६ हजार रुपये भाव द्या, आज १० वर्षानंतर आम्ही मागणी करतो, देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले, पण त्यांनी स्वतःची मागणी पूर्ण केली नाही, आज ते महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आहेत आणि पाशा पटेल कृषिमूल्य आयोगाचे अध्यक्ष आहेत. त्यांनी कापूस, सोयाबीन, धान्याच्या बाबतीत कृषीमालाला कशा पध्दतीने चांगला भाव मिळेल, याबाबत निर्णय घ्यायला पाहिजे, त्यामुळे आमची मागणी आहे की, कापसाला १४ हजार रुपये, सोयाबीनला ८ हजार रुपये भाव दिला पाहिजे आणि त्याचबरोबर धानाचा बोनस देखील लवकरात लवकर जाहीर केला पाहिजे. असे आमदार अनिल देशमुख यांनी अधिवेशनात सांगितले.

हे ही वाचा:

IPL च्या शेवटच्या सिझनमध्ये शुभमनच्या बॅटने केल्या सर्वाधिक धावा, यावेळी कोण बनू शकतो नंबर १…

इक्बाल मिर्चीचा पार्टनर प्रफुल्ल पटेल व भ्रष्टाचारी अजित पवार फडणवीसांना कसे चालतात?, नाना पटोले

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss