Wednesday, February 28, 2024

Latest Posts

POLITICS: आम्ही काय मागणी केली? आम्ही असा काय गदारोळ केला? SUPRIYA SULE यांचा सवाल

संसदभवन परिसरातून सरकार विरोधात खासदार निलंबनाबाबत आंदोलनातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांनी माध्यमांशी संवाद साधला. संसदेच्या कामाकाजावेळी विरोधी पक्षांच्या खासदारांचं निलंबन करण्यात आले. या प्रकरणी दिल्लीत सर्व विरोधी पक्षांनी एकत्र येत सरकार विरोधात मोर्चा काढला. खासदारांची एकच मागणी होती की, चार पाच दिवसांपूर्वी जे लोक संसदेत घुसले. ते लोक संसदेचे सदस्य नव्हते. ते सभागृहात कसे आले? त्यांना पास कोणी दिला? यावर सभागृहात चर्चा होणं गरजेचं आहे. याबाबतची मागणी विरोधकांनी केली होती. यावर सरकारकडून उत्तर अपेक्षित होतं, पण सरकारनं याबाबत काही उत्तर दिलं नाही. याउलट याबाबत चर्चेची मागणी करणाऱ्या खासदारांचे निलंबन केल्याचे आजपर्यंतच्या संसदेच्या इतिहासात असं कधी घडलं नव्हते. विरोधकांना नजर अंदाज करुन सरकार कारभार करु पाहत आहे. देशातील जनता सगळं पाहत आहे, सरकारला याची किंमत मोजावी लागेल. सर्वसामान्य जनता त्यांना बरोबर त्यांची जागा दाखवून देईल. असे मत शरद पवार यांनी व्यक्त केले.

आम्ही असा काय गदारोळ केला?

लोकशाहीची हत्या ही दिल्लीमध्ये होत आहे ही अतिशय दुर्दैवी बाब आहे, त्याबरोबरच आणीबाणीची परिस्थिती या देशांमध्ये निर्माण झालेली आहे. विरोधक नसताना बिल पास करणे ही कुठली लोकशाही आहे. आमची चर्चेला बसायची परवा, कालही तयारी होती. आम्ही मागणी काय केली? आम्ही असा काय गदारोळ केला ? काहीच केलं नाही. बीजेपीने विरोधात असताना यापेक्षा दहा पटीने गोंधळ घातला होता, परंतु आमचे सरकार असताना चर्चा व्हायच्या; बोलूया, बसुया, चर्चा करूया हरकत नाही असे आम्ही करायचो, परंतु या सरकारला मार्गच काढायचा नाही आहे, ही दडपशाही आहे यात लोकशाहीची हत्या होत आहे. काल बिल लोकसभेत पास झाले राज्यसभेत झाले नाही. लोकसभेच्या मेंबर्स बद्दल काही आक्षेप असेल तर, त्याबद्दल चर्चा होऊ शकते ना. कायदे आणि नियम हे राहुल गांधींच्या एका व्हिडिओशी संबंधित आहेत का? त्या घटनेचा सर्वसामान्य मायबाप जनतेशी काहीही संबंध नाही. त्या ठिकाणी एकटे राहुल गांधी व्हिडिओ काढत नव्हते; अनेक खासदार व्हिडिओ काढत होते. सरकार विषय डायव्हर्ट करण्याचा प्रयत्न करत आहे. लोकशाहीची हत्या आम्ही सहन करणार नाही, पूर्ण ताकदीने आम्ही लढणार. असे मत सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केले.

हे ही वाचा:

कोरोनाच्या JN1 व्हेरियंटमुळे पालिका प्रशासन सतर्क, रुग्ण संख्येत वाढ सरकारला याची किंमत मोजावी लागेल, खासदार निलंबनावरून शरद पवार यांचा हल्लाबोल

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा. 

Latest Posts

Don't Miss