Saturday, May 18, 2024

Latest Posts

मोदी आज तेच करतायत ना, दारूड्याचे उदाहरण देत प्रकाश आंबेडकरांनी केली मोदींवर टीका

बहुजन समाज पक्षाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी नुकतंच एका कार्यक्रमात भाषण करत असताना पंतप्रधान नरेंद्र मोदींवर (PM Narendra Modi) घणाघात आरोप केले आहे. यावेळेस प्रकाश आंबेडकर यांनी माजी माजी पंतप्रधान नरसिंहराव यांच्या काळात देशात झालेल्या आर्थिक मंदीवर भाष्य करत. त्याकाळात देशातील सोनं बँक ऑफ इंग्लंडमध्ये गहाण ठेवले होते. तर त्याचे नंतर काय झाले आणि अद्याप ते का सोडवले गेले नाही असा सवालही प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे. आणि दारुड्याचे उदाहरण देत मोदी आज तेच करतायत ना ? असा सवाल करत प्रकाश आंबेडकर यांनी पंतप्रधान मोदींवर घल्लबोल केला आहे.

नुकतच बहुजन समाज पक्षाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी एका कार्यक्रमातील भाषणादरम्यान त्यांनी पंतप्रधान मोदींवर जोरदार हल्लाबोल केला आहे. यावेळेस प्रकाश आंबेडकर म्हणाले की, “माजी पंतप्रधान नरसिंहराव यांच्या काळात देशातील सोनं बँक ऑफ इंग्लंडमध्ये गहाण ठेवले होते. मी अनेकवेळा विचारलं ते सोनं परत आणलं का? पण त्यावर कुणी उत्तर देत नाही. यावरून देशाची परिस्थिती काय आहे ते बघा. आपल्या घरातलं सोनं जेव्हा आपण गहाण ठेवतो आणि ते सोडवता येत नाही. त्यावरुन आपले घर आर्थिक दुबळे असल्याचा निष्कर्ष काढला जातो. एखादा दारुडा अशावेळी घरातली भांडीकुंडी विकून घर चालवतो. सगळं विकून झालं की दारूडा आपलं घरही विकून टाकतो. आज नरेंद्र मोदी नेमके तेच करतायत की नाही सांगा?” असा सवालही प्रकाश आंबेडकर यांनी विचारला.

प्रकाश आंबेडकर पुढे म्हणाले की “घर चालवायला आपल्याला हजार रुपये लागत असतील आणि आपली कमाई ८०० रुपये असेल तर वरचे २०० रुपये कर्ज काढावे लागतात. त्याप्रमाणेच आज नरेंद्र मोदी कर्ज काढून देश चालवत आहेत. या कर्जासाठी कारखाने विकण्याचा सपाटा त्यांनी सुरु केला आहे.” असे म्हणत प्रकाश आंबेडकर यांनी मोदींवर घणाघात आरोप केले आहेत.

हे ही वाचा:

Time Maharashtra Exclusive, मोठी बातमी; आप्पासाहेब धर्माधिकारी महाराष्ट्र भूषण!

MPSCचा नवा अभ्यासक्रम २०२५ पासून लागू करण्याला सरकारने दिली मान्यता

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss