Saturday, March 2, 2024

Latest Posts

प्रकाश आंबेडकरांची महायुती सरकारवर टीका

मराठा आरक्षणाचा मुद्दा राज्यभरात सगळीकडे तापला आहे.

मराठा आरक्षणाचा मुद्दा राज्यभरात सगळीकडे तापला आहे. या मुद्द्यावरून अनेकांनी आपल्या प्रतिक्रिया मांडल्या आहेत. मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange) यांच्या मागणीवर माझ्याकडे उपाय आहे, मात्र आताच्या या चोरांसमोर मांडलं तर हे त्याचं खोबरं करतील त्यामुळे मी ते मांडणार नाही, असे वक्तव्य वंचितचे प्रमुख प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी केले आहे. नवीन सत्ताधारी येऊ द्या त्यानंतर त्यांना सांगता येईल की आरक्षणाचा (Maratha Reservation) मुद्दा कसा हाताळायचा आणि तो हँडल करत असताना ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता कसा हाताळायचा हे मी त्यांना सांगेन परंतु आताच्या सत्ताधाऱ्यांना सांगणार नसल्याची प्रतिक्रिया प्रकाश आंबेडकर यांनी दिली आहे.

गिरीश महाजन यांनी एका प्रश्नाचे उत्तर द्यावं की अॅड. जनरल कुंभकोणी यांनी यशस्वीरित्या मुंबई उच्च न्यायालयात मराठा आरक्षणासंदर्भात खटला लढवला. मात्र त्यांच्या सरकारने कुंभकोणी यांना पुढे परत काम का करू दिले नाही? त्या केस मध्ये लक्ष घालू नका, हजर राहू नका हे आदेश का दिले. हे महाजन यांनी सांगितलं पाहिजे. याचे उत्तर महाजन यांनी द्यावं म्हणजे त्यांच्या दीर्घकालीन आरक्षणाच्या सांगण्यावर विश्वास ठेवता येईल, असे म्हणत प्रकाश आंबेडकर यांनी मंत्री गिरीश महाजन यांच्यावर टीका केली आहे.

नागपूरमध्ये अधिवेशन सुरू आहे असं वाटत नाही, विरोधी पक्ष कोण आणि सत्ताधारी पक्ष कोण हेच समजत नाही. जे सत्ताधारी पक्षांनी मांडलं पाहिजे ते विरोधी पक्ष मांडत आहे आणि जे विरोधी पक्षाने मांडलं पाहिजे ते सत्ताधारी पक्ष मांडतो आहे. असा लोकशाहीमधील तमाशा विधिमंडळात सुरू आहे. अनेक ज्वलंत प्रश्न आहेत पण त्याची चर्चा सभागृहामध्ये होत नाही. सगळ्यात महत्त्वाचं आहे की क्रॉप इन्शुरन्सबद्दल अजूनही ठोस निर्णय घेण्यात आला नाही.काँग्रेसने भाजपवर आरोप केला आहे की, भाजपला बहुमत सिद्ध करता येत नाही म्हणून पक्ष फोडीचे राजकारण करते. मात्र काँग्रेसने देखील असेच केले आहे. काँग्रेसने आमच्या सोबत देखील असेच केले होते, आम्ही त्याचे भोगी आहोत. काँग्रेसने जे केलं तेच बीजेपी करते आहे , अशी टीका प्रकाश आंबेडकर यांनी काँग्रेस पक्षावर केली आहे.

हे ही वाचा:

लोकसभा अध्यक्षांची मोठी कारवाई, अधीर रंजन चौधरी यांच्यासह विरोधी पक्षांचे ३३ खासदार निलंबित

अदानी प्रकरणातील राज ठाकरेंच्या आरोपाला उद्धव ठाकरेंचे जशास तसे उत्तर

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा. 

Latest Posts

Don't Miss