Wednesday, February 28, 2024

Latest Posts

विधानसभेत प्रणिती शिंदे-तानाजी सावंत यांच्यात रंगली जुगलबंदी

वैद्यकीय शिक्षण आणि औषधी द्रव्य विभागाच्या वैद्यकीय अधिक्षक यांना राज्य रक्त संक्रमण परिषदेमार्फत सूचना देण्यात आल्या आहेत.

आरोग्य खात्यावरून सुरू असलेल्या चर्चेत आज विधानसभेत आमदार प्रणिती शिंदे आणि आरोग्यमंत्री तानाजी सावंतयांची जुगलबंदी रंगली. सोलापूर जिल्हा रूग्णालयाबाबत प्रणिती शिंदेंनी औषधांच्या तुटवड्याचा सवाल उपस्थित केला. त्यावर आपल्याला याबाबत संबंधित लोकप्रतिनिधींनी कधीही पत्र दिलं नाही असं उत्तर दिलं. या प्रश्नावरून विधानसभा अध्यक्षांनीही आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांना सुनावलं आहे.

विधानसभा अध्यक्ष नार्वेकरांनी आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांचे कान टोचले आहेत. लोकप्रतिनिधींनी पत्र दिलं तरच काम करायचं असतं असं नाही. सोलापूर रुग्णालयासाठी एक तरी पत्र दिलं का? असा प्रश्न आरोग्य मंत्री यांनी आमदार प्रणिती शिंदे यांना केला होता.

सभागृहात नेमकं काय घडलं?
प्रणिती शिंदे : आरोग्य शिबिरामध्ये लोह, मधुमेहाच्या गोळ्या जबरदस्ती दिल्या जातात.ज्यामुळे सिव्हिल रूग्णालयात गर्भवती महिलांसाठी तुटवडा होतो.सिव्हिल रूग्णालयात सीटी स्कॅनच्या मशिन्स बंद आहेत, त्यामुळे त्यांना प्रायवेटमधे जावं लागतं.

तानाजी सावंत : सिव्हिल रूग्णालयाचा प्रश्न वैद्यकीय शिक्षणाचा आहे. औषधांच्या तुटवड्याच्या प्रश्नासाठी मला कधी पत्रच दिलं नाही तर मी कशी कारवाई करणार? मला पत्र द्या तर मी तातडीने कारवाई करेल.

विधानसभा अध्यक्षांनी कान टोचले
आरोग्यमंत्र्यांनी दिलेल्या उत्तरावर विधानसभा अध्यक्षांनी तानाजी सावंत यांचे कान टोचले. विधानसभा अध्यक्ष म्हणाले, लोकप्रतिनिधींनी पत्र दिले तरच काम करायचं नसतं. जनतेचं प्रश्न सोडवणं सरकारच काम असते. सरकारचे नाही तर लोकप्रतिनिधीचे देखील काम आहे. जनेतची काम करणे हे लोकप्रतिनिधींचे काम आहे.

आमदार प्रणिती शिंदे आरोग्यमंत्र्यावर भडकल्या
आमदार प्रणिती शिंदे म्हणाले, माझ्यावर व्यक्तिगत टीका होईल असं अपेक्षित नव्हतं या मंत्र्यांचा आदर मी करते . आम्ही जनतेचं प्रश्न विचारत आहोत. तुम्ही वैद्यकीय शिक्षण विभागाचं मंत्री नाहीत म्हणालात मग पत्र कसं लिहिणार. मी मुख्यमंत्र्यांना अनेक वेळा पत्र दिलं आणि प्रश्न लागत नाही म्हणून हा प्रश्न विचारला.

शासनाच्या सर्व रक्तपेढ्यांमध्ये अँलिकॉट बसवणार

वैद्यकीय शिक्षण आणि औषधी द्रव्य विभागाच्या वैद्यकीय अधिक्षक यांना राज्य रक्त संक्रमण परिषदेमार्फत सूचना देण्यात आल्या आहेत. तिथेही मशीन एक महिन्यात उपलब्ध करुन देण्यात येतील शिवाय खाजगी रक्तपेढ्यांनाही सूचना देण्यात येतील, असं आरोग्य मंत्र्यांनी स्पष्ट केलं आहे.सार्वजनिक आरोग्य विभागाच्या अधिपत्याखालील ३१ शासकीय रक्तकेंद्रामध्ये अँलिकाँट मशीनउपलब्ध नाहीत, अशा ठिकाणी सदरचं मशीन येत्या एका महिन्यात बसवण्यात येतील, अशी घोषणा आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी विधानसभेत केली आहे. मशीन उपलब्ध नाहीत अशा ठिकाणी सदरचे मशीन येत्या एका महिन्याच्या कालावधीमध्ये आवश्यक ती खरेदीची प्रक्रिया अवलंबून खरेदी करण्यात येतील.

 

हे ही वाचा : 

पायल रोहतगीने पठाण चित्रपटाला समर्थन देत सनी लियोनवर साधला निशाणा

‘आभाळमाया’ फेम अभिनेते पराग बेडेकर यांच वयाच्या ४७ व्या वर्षी झाल हृदयविकाराच्या झटक्याने निधन

‘आभाळमाया’ फेम अभिनेते पराग बेडेकर यांच वयाच्या ४७ व्या वर्षी झाल हृदयविकाराच्या झटक्याने निधन

Follow Us
टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss