Saturday, July 27, 2024

Latest Posts

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा पुन्हा एकदा काँग्रेसवर निशाणा

ओडिशामधील काँग्रेस खासदार धीरज साहू यांच्याकडे ३५१ कोटींची बेहिशोबी रोकड जप्त करण्यात आली.

ओडिशामधील काँग्रेस खासदार धीरज साहू यांच्याकडे ३५१ कोटींची बेहिशोबी रोकड जप्त करण्यात आली. तसेच जवळपास तीन किलोंचे सोन्याचे दागिने प्राप्तीकर विभागाने हस्तगत केले आहेत. या विषयावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसवर पुन्हा एकदा निशाणा साधला आहे. भाजपाने आपल्या एक्स या सोशल मीडिया हँडलवर एक व्हिडिओ पोस्ट केला होता. हा व्हिडिओ शेअर करत असताना पंतप्रधान मोदी या कारवाईचा संबंध ‘मनी हाईस्ट’ या नेटफ्लिक्सवरील लोकप्रिय वेब सीरीजशी लावला. पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, ‘मनी हाईस्ट’ या काल्पनिक कथानकाची भारतात गरज आहे का? काँग्रेस सारखा पक्ष देशात असताना त्यांनी मागच्या ७० वर्षांपासून ‘हाईस्ट’ केलेली आहे, ज्याची मोजदाद अजूनही सुरू आहे.”

काँग्रेसचे राज्यसभेचे खासदार धीरज साहू यांच्या झारखंड, आणि पश्चिम बंगालमधील कार्यालयांवर आणि रांची येथील निवासस्थानी ६ डिसेंबर रोजी प्राप्तीकर विभागाने छापेमारी केली होती. पाच दिवस साहू यांच्याकडील बेहिशोबी रोकडीची मोजणी सुरू होती. ७ डिसेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्यांदा या विषयावर सोशल मीडियावर पोस्ट टाकून नोटांच्या थप्पीवरून काँग्रेसवर निशाणा साधला होता.

काँग्रेस खासदार धीरज साहू यांच्यावर सुरू असलेल्या कारवाईचा एक मिनिटांचा व्हिडिओ भाजपने शेअर केला आहे. या व्हिडिओत कपाटातून नोटांच्या थप्प्या हस्तगत केल्याचे दिसत आहे. तसेच यावेळी धीरज साहू यांचे काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जून खरगे आणि काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यासमवेतचे फोटो दिसत आहेत. तसेच व्हिडिओच्या शेवटी साहू यांच्याकडे किती रोकड जप्त झाली, याची बातमीही दिसत आहे. व्हिडिओमध्ये राहुल गांधी यांचा चेहरा असलेले एक मीमही दिसते. जे मनी हाईस्ट या सीरीजीमधील आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी याआधीही एक्स या सोशल मीडिया साईटवर एक पोस्ट टाकून काँग्रेसवर निशाणा साधला होता. “देशातील नागरिकांनी या नोटांच्या ढिगाऱ्याकडे पाहावे आणि नंतर त्यांच्या (काँग्रेसच्या) इमानदार नेत्यांची भाषणे ऐकावित, जनतेकडून लुटलेल्या पै-पैचा हिशेब द्यावा लागेल. ही मोदीची गॅरंटी आहे”, अशी पोस्ट टाकून पंतप्रधान मोदी यांनी काँग्रेसवर जोरदार टीका केली होती.

 

हे ही वाचा : 

पायल रोहतगीने पठाण चित्रपटाला समर्थन देत सनी लियोनवर साधला निशाणा

‘आभाळमाया’ फेम अभिनेते पराग बेडेकर यांच वयाच्या ४७ व्या वर्षी झाल हृदयविकाराच्या झटक्याने निधन

‘आभाळमाया’ फेम अभिनेते पराग बेडेकर यांच वयाच्या ४७ व्या वर्षी झाल हृदयविकाराच्या झटक्याने निधन

Follow Us
टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss