Saturday, May 18, 2024

Latest Posts

विरोधी पक्षाच्या नेत्यांना भेटणार असल्याच्या बातम्या चुकीच्या, अखिलेश यादव

समाजवादी पक्षाचे (Samajwadi Party) अध्यक्ष आणि उत्तर प्रदेशचे (Uttar Pradesh) माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव (Akhilesh Yadav) सोमवारी मुंबई दौऱ्यावर आलेले होते.

समाजवादी पक्षाचे (Samajwadi Party) अध्यक्ष आणि उत्तर प्रदेशचे (Uttar Pradesh) माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव (Akhilesh Yadav) सोमवारी मुंबई दौऱ्यावर आलेले होते. आपल्या या मुंबई दौऱ्या दरम्यान अखिलेश यादव मुंबईत विरोधी पक्षाच्या नेत्यांच्या भेटी घेणार असल्याचं बोललं जात होतं. परंतु, त्यांनी कोणत्याही विरोधी पक्षाच्या नेत्याची भेट घेतली नाही. यावर अखिलेश यादव यांचा हा खाजगी दौरा होता, हा कोणाताही राजकीय दौरा नव्हता. त्यामुळे त्यांनी कोणत्याही राजकीय भेटी-गाठी घेतल्या नसल्याचं समाजवादी पक्षाच्या पदाधिकाऱ्यानं सांगितलं. तसेच, अखिलेश यादव यांनीही याच मुद्द्यावरुन माध्यमांवर नाराजी व्यक्त केली.

समाजवादी पक्षाच्या नेत्यानं सांगितलं की, अखिलेश यादव यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (NCP) अध्यक्ष शरद पवार यांच्यासोबत कोणतीही नियोजित बैठक नव्हती. भाजपला घेरण्यासाठी शरद पवार विरोधी पक्षांची एकजूट करण्याचा प्रयत्न करत आहेत. यामध्ये अखिलेश यादवही त्यांच्यासोबत आहे. या पार्श्वभूमीवर मुंबई दौऱ्यावर आलेले अखिलेश यादव शरद पवारांची भेट घेणार असल्याचं बोललं जात होतं. टोमॅटोचे भाव कडाडल्याची बातमी दाखवली तरी सध्याच्या केंद्र सरकारमध्ये हलकल्लोळ माजतो, अशी टीका समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांनी आपल्या मुंबई दौऱ्यात केली आहे. सध्या महागाई प्रचंड वाढली असल्याचा आरोप करून अखिलेश यादव म्हणाले की, डाळतांदळापासून पेट्रोलपर्यंत प्रत्येक वस्तू महागल्या आहेत. पण दडपशाही इतकी आहे की, उत्तर प्रदेशात कोणी टोमॅटोचा भाव विचारला तरी त्याला पोलीस अटक करतात. देशातला शेतकरी एक ना अनेक समस्यांनी त्रस्त आहे. आणि त्यामुळंच अर्थव्यवस्था डगमगत असल्याचा आरोप अखिलेश यांनी केला. भाजप समाजात तोडफोड करण्याचं राजकारण करत असल्याचा आरोपही त्यांनी केला.

दुसरीकडे आपल्या मुंबई दौऱ्यात अखिलेश यादव यांनी राज्यातील सपा नेत्यांची भेट घेतली. “भाजपची रणनीती काय आहे, कधी कधी कोणालाच कळत नाही. भाजप असे काम करते, पक्ष फोडते, फूट पाडते, त्यांचा वाटा हिसकावून घेते.”, असं अखिलेश यादव कार्यकर्त्यांशी बोलताना म्हणाले. अखिलेश यादव म्हणाले की, भारतीय जनता पक्ष अशा प्रकारे पक्षामध्ये फूट पाडून पुढे जात आहे. दरम्यान, भाजपविरोधात विरोधकांची एकजूट करण्याची कसरत सातत्यानं सुरू आहे. यासंदर्भात २३ जून रोजी पाटण्यात अनेक पक्षांची बैठक झाली. मात्र यानंतर महाराष्ट्रात राष्ट्रवादीत फूट पडली आणि अजित पवार भाजपच्या साथीनं सरकारमध्ये सहभागी झाले.

हे ही वाचा:

तीन तास चर्चा करून मंत्रिमंडळ विस्तार आणि खातेवाटपाबाबतचा झाला निर्णय ?

छगन भुजबळ यांना जीवे मारण्याची धमकी

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss