Saturday, March 2, 2024

Latest Posts

ROHIT PAWAR यांचे FACEBOOK HACK, चुकीची माहिती दुर्लक्षित करण्याचा दिला सल्ला

गेल्या काही दिवसांपासून माझे सोशल मीडिया अकाउंट हॅक होण्याचे प्रकार सुरू आहेत. आता माझं अधिकृत पेज हॅक झाले आहे. या पेजवर चुकीचा मजकूर दिसून येत असून, कृपया याकडे दुर्लक्ष करावे याबाबत रिकव्हरीसाठी प्रयत्न सुरू आहेत.

सोशल मीडिया हा आता प्रत्येकाच्या जगण्याचा भाग झाला आहे. प्रत्येक गोष्ट सोशल मीडियावर शेअर करणे हे अगदी नित्याचं काम झालं आहे. सोशल मीडिया जितके चांगली आहे, तितकेच कुठेतरी घातक सुद्धा आहे. सोशल मीडियाचा वापर करून काहींना बदनाम करण्याचा प्रयत्न केला जातो. हॅकर्स योग्य ती माहिती काढून आणि चुकीची माहिती पुरवण्याच्या दृष्टीने सोशल मीडियाचे अकाउंट हॅक करतात. सध्या सोशल मीडियाचे अकाउंट हॅक (SOCIAL MEDIA ACCOUNT HACK) होण्याच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसून येत आहे. सोशल मीडिया अकाउंट हॅक होण्यामध्ये सामान्य नागरिकांपासून बॉलिवूडचे अभिनेत्री-अभिनेते तसेच इतर राजकीय नेते मंडळी यांचे देखील अकाउंट हॅक होताना दिसून येत आहेत.

नुकतेच राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार (NCP MLA ROHIT PAWAR) यांनी आपलं सोशल मीडिया अकाउंट हॅक होत असल्याची माहिती दिली आहे. रोहित पवार यांचा फेसबुक पेज (FACEBOOK PAGE) प्रत्यक्षात हॅक करून सिया राजपूत (SIYA RAJPUT) नावाने प्रोफाइल बनवण्यात आले आहे. रोहित पवार यांनी युवा संघर्ष यात्रा (YUVA SANGHARSH YATRA) सुरू असताना युवा संघर्ष यात्रेचे पेज हॅक झाल्याचा आरोप केला होता. त्यानंतर आता त्यांचे फेसबुक पेज हॅक करून प्रोफाइल नाव (PROFILE NAME) आणि फोटो (PHOTO) बदलण्यात आला आहे. रोहित पवार यांनी आपल्या ट्विटर अकाउंट (X ACCOUNT) वरून आपले फेसबुक पेज हॅक झाल्याची माहिती दिली. यामध्ये रोहित पवार म्हणाले की, गेल्या काही दिवसांपासून माझे सोशल मीडिया अकाउंट हॅक होण्याचे प्रकार सुरू आहेत. आता माझं अधिकृत पेज हॅक झाले आहे. या पेजवर चुकीचा मजकूर दिसून येत असून, कृपया याकडे दुर्लक्ष करावे याबाबत रिकव्हरीसाठी प्रयत्न सुरू आहेत.

रोहित पवार यांनी ट्विटरच्या माध्यमातून त्यांचा फेसबुक अकाउंट हॅक झाल्याची माहिती देताच अनेक नेटकरांनी त्यावर प्रतिक्रिया दिल्या आहेत. रोहित पवार (ROHIT PAWAR) यांच्या फेसबुक पेजवर सिया राजपूत असे नाव दिसत आहे. तसेच कपड्याचा ब्रँड असल्याच्या पेजच्या माहितीमध्ये दिला आहे. या अकाउंटच्या पेजवर तसेच प्रोफाइल फोटो आणि कव्हर फोटोवर सिया राजपूत असे नाव दिसून येत आहे. हे पेज रिकव्हर करण्याचा प्रयत्न सुरू असल्याची माहिती रोहित पवार यांनी दिली आहे.

हे ही वाचा:

राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकाच कार्यक्रमात

पुण्यात भटक्या कुत्र्याचा धुमाकूळ, हल्ल्यात चिमुकला गंभीर जखमी

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा. 

Latest Posts

Don't Miss